आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात गाळे पाहिजे, नगरसेवकांना सांगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात महापालिकेची जागा लाटणे हे नवीन नसून, उद्यान, पाण्याची टाकी परिसरातील जागेवर नगरसेवकांचा डोळा असून, त्यानुसार प्रस्ताव देत आहेत. जुळे सोलापुरात पाण्याच्या टाकी परिसरात डिपाॅिजट पध्दतीन गाळे देण्याचा प्रस्ताव मनपा सभागृहात आला आहे. याशिवाय मित्रगोत्री पाण्याच्या टाकीजवळ काही जणांना जागा देण्याचा प्रस्ताव आला आहे. यापूर्वी जुळे सोलापुरात पाण्याच्या टाकीजवळ अशा प्रकारे गाळे देण्याचा प्रस्ताव मनपा स्थायी समितीत झाला होता. त्यास तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांनी ब्रेक लावला. ते प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले आहे. शहरातील जागा आपल्या जवळच्या कार्यकर्त्याना देण्याचा फंडा तयार झाला आहे. वशिेष म्हणजे जागेचा प्रस्ताव दिल्याचे माजी महापौर आरिफ शेख यांना माहिती नाही.
यापूर्वीचे प्रकरण
जुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीजवळ १२ जणांना गाळे देण्याचा प्रस्ताव यापूर्वी मार्कंडेय उद्यान येथे बागेची जागा देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत आला होता. त्यास विरोध झाल्याने तो बारगळला. जयभवानी उद्यान येथील जागा अथर्व गार्डनसाठी मनपाने बीओटीवर दिली आहे.
आता स्थायीत प्रस्ताव
मित्रगोत्री पाण्याच्या टाकीजवळ आठ जणांना गाळे देण्याचा प्रस्ताव (स्थायी समितीत प्रस्ताव)
बुधवारी सभेत विषय साधुवासवानी उद्यानजवळ मोकळ्या जागेत दहा बाय दहाचे ११ गाळे (बुधवारच्या मनपा सभेपुढे विषय)

मला माहिती नाही
साधुवासवानी उद्यानजवळ जागा देण्याचा विषय आणि तेथील लाभार्थी यांची माहिती मला नाही. महापौरांचे स्वीय सहाय्यक मल्लू सकट यांनी स्वाक्षरी करा म्हटल्याने मी केली.
आरिफ शेख, नगरसेवक
पुढे काय होईल
पाण्याची टाकी परिसरातील जागा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असताना पाण्याच्या टाकीजवळील जागा नगरसेवक लक्ष करतील, आपल्या जवळच्या कार्यकर्त्याना देतील. याशिवाय उद्यान परिसरातील मोक्याच्या जागेवर लक्ष केंिद्रत करतील.