आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा विषय ‘पाण्यात’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा जीवन प्राधिकरणाकडे सोपवण्याच्या प्रस्तावावर धोरणात्मक निर्णय घेण्यास सत्ताधारी हतबल दिसले. प्राधिकरण तयार असेल तर आयुक्तांनी निर्णय घेऊन सभागृहापुढे अहवाल ठेवावा, असा ठराव घेण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेतून आमदार दिलीप माने यांच्या मतदार संघात विद्युत कामे करण्यासाठी एक कोटी 11 लाख 21 हजार रुपयांच्या कामास मनपा सभागृहाने मंगळवारी मान्यता दिली.

महापालिका सर्वसाधारण सभा मंगळवारी सायंकाळी झाली. शहर पाणीपुरवठा जीवन प्राधिकरणाकडे देण्याची मागणी नगरसेवक प्रवीण डोंगरे यांनी प्रशासनाकडे केली होती. त्यावर सभागृहात धोरणात्मक निर्णयासाठी आयुक्ताकडून हा विषय आला होता. पुन्हा आयुक्ताकडेच सभागहाने फिरवला. प्राधिकरण तयार असेल तर आयुक्तांनी तसा अहवाल सभागृहात ठेवावा, अशी सूचना सभागृह नेते महेश कोठे यांनी मांडली.

‘दक्षिण’मध्ये 111 लाखांची कामे
शहर दक्षिण मतदार संघात विद्युत कामे करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळणार आहे. महापालिकेचा निम्मा हिस्सा यामध्ये असणार आहे. या कामास सभागृहात मान्यता देण्यात आली.