आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Civic News In Marathi, Less Response For Housing Society Registration, Divya Marathi

तीन वर्षांत केवळ 10 संस्थांची नोंदणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपार्टमेंटमधील फ्लॅट स्वत:च्या मालकीचे करून घेण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करावी लागते. परंतु सोलापूरकर त्याला प्रतिसादच देत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे फ्लॅटधारक महसूल खात्याकडे अपार्टमेंट कायद्याखाली नोंदणी केलेल्या गृहप्रकल्पात राहतात. त्यामुळे बिल्डरची मालकी संपत नाही. पुढे उद्भवणार्‍या कायदेशीर पेचातूनही सुटका होत नाही, अशी अवस्था झाली.
सहकारी संस्थांच्या शहर उपनिबंधक कार्यालयात माहिती घेतली असता, संस्था स्थापनेसाठी फ्लॅटधारक पुढे येत नाहीत, असेच एकंदरीत चित्र आहे. राज्य शासनाने ‘मानवी अभिहस्तांतरण मोहीम’ राबवून बिल्डरांच्या इमारती फ्लॅटधारकांच्या मालकीचे करण्याचे काम हाती घेतले. त्यालाही सोलापूरकर प्रतिसाद देत नाहीत, असे सांगण्यात आले. गेल्या दोन वर्षांत शहरात फक्त 10 संस्थांची नोंदणी झाली.
नोंदणीसाठी अत्यल्प प्रतिसाद
4बांधकाम व्यावसायिक ‘अपार्टमेंट अँक्ट’खाली दुय्यम निबंधकांकडेच गृहप्रकल्पाची नोंदणी करतात. कायद्यानुसार एका पटलावर (महसूल) एकदा नोंदणी झाली, की दुसर्‍या ठिकाणी करता येत नाही. त्यामुळे फ्लॅटधारकांची अडचण होत असावी. नोंदणीसाठी अत्यल्प प्रतिसाद आहे.’’ बी. एस. कटरे, शहर निबंधक, सहकारी संस्था
फ्लॅटधारक एकत्र यावेत
4गृहप्रकल्पातील सर्व फ्लॅटधारक एकत्र येऊन ‘अपार्टमेंट अँक्ट’खालील डिक्लेरेशन रद्द केले. संबंधित बांधकाम व्यावसायिकाची ‘ना हरकत’ मिळवली, तर सहकारी संस्था स्थापन करता येते. परंतु एकूणच हा मुद्दा वादाचा आहे. त्याला शासनाची धोरणेही तितकीच जबाबदार आहेत.’’ राजेंद्र शहा, क्रेडाईचे राज्य उपाध्यक्ष
मानवी अभिहस्तांतरणासाठी आवश्यक कागदपत्रे
2013 812
2012 803
2011 802
2010 792
गृहनिर्माण संस्थांची नोंदणी झाली.
नोंदणी गेल्या 3 वर्षात
0बिल्डर-ग्राहक यांच्यात झालेल्या कराराची नोंदणीकृत प्रत
0व्यवहार केल्याचा कोणताही लिखित पुरावा-नोटीस वगैरे
0फेरफार नोंदीसह सातबारा उतारा आणि गावनमुना क्रमांक
0मालमत्ता पत्रिका, बिगरशेतीचे आदेश, भोगवटा प्रमाणपत्र
0फ्लॅट खरेदीदारांची यादी, मुद्रांक शुल्क भरल्याचा पुरावा
नोंदणी केली नाही
0अपार्टमेंटच्या जागेसंदर्भात बिल्डर भविष्यात फ्लॅटधारकांना अडचणीत आणू शकतो.
0फ्लॅटधारकांच्या सोयीसाठी राखीव ठेवलेली जागा त्याला वाटेल त्याला देऊ शकतो.
संस्था नोंदणी कशासाठी?
1. अपार्टमेंटच्या जागेवरील बिल्डरची मालकी संपुष्टात येऊन संस्थेची मालकी येते.
2. भविष्यात पार्किंगची जागा विकणे, वरचा मजला बांधणे, या गोष्टी बिल्डरच्या हाती नसतात.
3. सर्व अधिकार संस्थेकडे येत असल्याने फ्लॅटचे मालक, अपार्टमेंटचे मालक होतात.
4. इमारतीची देखभाल, इतर सुविधांबाबत फ्लॅटधारक स्वत: निर्णय घेऊ शकतात