आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Civil Doctor News In Marathi, Civil Doctor Beaten Up Issue At Solapur, Divya Marathi

सिव्हिल डॉक्टर मारहाणीच्या सीआयडी तपासाला सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापुरातील डॉक्टर मारहाणीचा सीआयडी तपास सुरू झाला आहे. पुण्याचे सीआयडी अधिकारी महेश थिटे त्यासाठी सोलापुरात आले आहेत. अत्यवस्थ महिलेच्या उपचारावरून 31 डिसेंबरच्या पहाटे सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयातील डॉक्टरला पोलिस अधिकारी वायकर यांनी मारहाण केली होती. हे प्रकरण राज्यभर गाजले होते.

थिटे म्हणाले, अधिकारी व्हनकडे आजारी रजेवर असून त्याची जबाबदारी माझ्याकडे आली. डॉक्टर आणि पोलिस अधिकार्‍यांकडूनही गुन्हे दाखल आहेत. सिव्हिलला या प्रकरणाची माहिती घेऊन सेक्शन 7 प्रमाणे समिती स्थापन करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. आम्हाला 17 फेब्रुवारी रोजी तपास कामकाजाचे आदेश आल्याने आता याचा तपास सुरू झाला आहे.