आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डफरीन’ आणि ‘बॉईज’मध्ये १०० खाटांचा होणार विस्तार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत शहरातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी ३२.८९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याअंतर्गत महापालिकेचे डफरीन (अहिल्यादेवी होळकर) बॉईज रुग्णालयात अद्ययावत सुविधा पुरविण्यात येणार असून या दोन रुग्णालयांतील खाटांचा विस्तार १०० करण्यात येणार आहे. तसेच मनपाच्या सात आरोग्य केंद्रांतही आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. शिवाय हद्दवाढ भागात चार नवीन आरोग्य केंद्रे सुरू केली जाणार आहेत. या योजनेमुळे सिव्हिल हॉस्पिटलवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे

यासंदर्भात सप्टेंबर रोजी मुंबईत आरोग्य विभागाची डॉ.. कुंदन यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक झाली आहे. नव्या योजनेनुसार शहरातील डफरीन बॉईज रुग्णालयाची निवड करण्यात आलेली आहे. सध्या या दोन रुग्णालयातील बेडची संख्या अनुक्रमे ३० २० आहेत. या योजनेमुळे या रुग्णालयातील बेडचा विस्तार होऊन १०० होणार आहे. याशिवाय या रुग्णालयात सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या योजनेकरिता प्राथमिक स्वरूपात तीन वर्षासाठी ३२.८९ कोटी मंजूर करण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीसाठी ५.५७ कोटी मंजूर असून ते अद्याप महापालिकेकडे वर्ग केले नाही.
महापालिकेच्या डफरीन (अहिल्यादेवी होळकर) रुग्णालयाची इमारत.

शासनाला प्रस्ताव सादर
१००खाटांचे दोन दवाखाना शहरात होणार आहेत. याकरिता लागणारी यंत्रणा तज्ज्ञ डॉ.क्टर, आैषधे यांची माहिती असलेला प्रस्ताव शासनाकडे दि.ला आहे.” डॉ.जयंती अडके, मनपा
चार नवीन आरोग्य केंद्रे
यायोजनेअंतर्गत चार नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू होणार आहे. त्यात देगाव, नई जिंदगी, सोरेगाव, विडी घरकुल या भागाचा समावेश आहे. राज्यातील महापालिकेकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते.

काय असेल सुविधा
अद्ययावतओपीडी, ऑपरेशन थिएटर, प्रसूतिगृह, सीझर करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा, आर्थोपेडिक, नवजात शिशू विभाग, बालरुग्ण विभाग, कान-नाक-घसा विभाग, निवासी डॉक्टर, सोनोग्राफी, लॅब, एक्सरे आदी सोयी असतील. सर्व प्रकारचे औषध, गोळ्या इतर साहित्य केंद्राकडून येणार आहे. यासाठी महापालिकेवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक ताण पडणार नाही.

असे असेल मनुष्यबळ
सर्जन,भूलतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, आर्थोपेडिक तज्ज्ञांसह आवश्यक डॉक्टर असणार आहेत. या सुविधेसाठी लागणारे मनुष्यबळ नव्याने करण्यात येणार आहे. कर्मचारी भरती राज्य शासनाकडून होणार आहे. शिवाय मनपाच्या दाराशा, साबळे, जिजामाता, भावनाऋषी, रामवाडी, जोडभावी, मजरेवाडी येथे सुविधा पुरवण्यात येणार आहे.