आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्र असूनही सुरू झाली नाही सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिव्हिलहॉस्पटिलमधील क्षयरोग (टीबी) बाह्यरुग्ण विभागातील क्ष-किरण सेवा यंत्र आणल्याच्या वर्षानंतरही सुरू होऊ शकलेली नाही. एक्स-रे फिल्म आणि ती धुण्यासाठी लागणारी अंधारखोली आदी यंत्रणा नसल्याची सबब प्रशासन पुढे करत आहे.विशेष म्हणजे क्षय रोग निदानासाठी क्ष-किरण चाचणी अत्यावश्यक बाब असते. क्षय रोगाच्या इलाजासाठी वाहिलेल्या विभागातच त्याच्याशविाय काम सुरू आहे. रुग्णांना या चाचणीसाठी सवि्हिल हॉस्पटिलच्या मुख्य विभागात चकरा माराव्या लागतात.
एक वर्षापूर्वी सुमारे एक लाख रुपये खर्चून एका पोर्टेबल क्ष-किरण यंत्रणाची खरेदी करण्यात आली. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञ आदी कर्मचारीही नेमण्यात आले. इतकी सगळी व्यवस्था असूनही काही दुय्यम गोष्टींसाठी क्ष-किरण सेवा सुरू झालेली नाही. महाराष्ट्रात सरकारी हॉस्पटिलमध्ये केवळ दोन ते तीनठिकाणीच टीबी पेशंटसाठी असे यंत्र आहे. त्यात सवि्हिल हॉस्पटिलचा समावेश आहे. वाॅर्डातही रुग्णांना सुविधा मिळत नाही. प्रशासनाकडे अधिकार असतानाही रुग्णांची गैरसोय होत आहे.
खेटे घालतात

-एक्सरे काढायचा असल्यास खूप फिरावे लागते. सवि्हिल हॉस्पटिलच्या ओपीडीत जाण्यास सांगतात. तिथे बी ब्लॉकमध्ये जाण्यास सांगतात. तिथेही खूप गर्दी असते. ताटकळत बसावे लागते. खूप धाप लागते.” समाधानकोरे, रुग्ण,सोलापूर
विभागात येतात रोज ४० रुग्ण
दररोज सुमारे ४० रुग्ण तपासणीसाठी येतात. सवि्हिल हॉस्पटिलमध्ये क्षयरोग बाह्यरुग्ण विभागात रुग्ण गेल्यानंतर त्यास मुख्य बाह्यरुग्ण विभागात जाण्यास सांगतात. तेथे १७ क्रमांकाच्या कक्षात सर्व प्रकारचे रुग्ण क्ष-किरण चाचणीसाठी येतात. त्यामुळे तेथे रुग्णांची मोठी गर्दी असते. संसर्गजन्य असलेल्या क्षय आजारास स्वतंत्र व्यवस्था अपेक्षित असते. उलट येथे गर्दीत त्याला थांबावे लागते.