आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्हिलची सुरक्षा केवळ 10 जणांवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील (सिव्हिल) सुरक्षेसाठी बसवण्यात आलेला तिसरा डोळा (सीसीटीव्ही) निकामी झाला आहे. एकूण विभाग 17, मात्र सुरक्षेसाठी केवळ 10 रक्षक, यामुळे रुग्णालयाची सुरक्षा बेभरवशाची झाली आहे.

दररोज हजारो रुग्णांची वर्दळ असणार्‍या संवेदनशील रुग्णालयाच्या सुरक्षेची भिस्त अवघ्या 10 कर्मचार्‍यांवर असल्याचे धक्कादायक वास्तव रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असता उजेडात आले. वारंवार होणार्‍या चोरीच्या घटनांनी कर्मचारी त्रस्त झाले असून या संदर्भात शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना निवेदन देऊन पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

प्रतीक्षालयात दिवसाढवळय़ा गंडा : रुग्णालयाच्या प्रतीक्षालयात बसलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना दिवसाढवळय़ा गंडा घालणारे महाठक येथे फिरत असतात. सुरक्षा कर्मचार्‍यांना त्याचा गंधही नसल्याची बाब खुद्द रुग्णांच्या नातेवाइकांनी उजेडात आणली आहे. कोणतीही प्रभावी सुरक्षा यंत्रणा अस्वित्वात नसल्याने रुग्णांची लूट, कर्मचार्‍यांना शस्त्राने मारहाण, चोर्‍या आदींचा सुळसुळाट झाला आहे. आयसीयू, प्रसूतिगृह, ट्रामा केअर या विभागांत बोटावर मोजण्याइतकेच सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, ए ब्लॉक, बी ब्लॉक आणि अेापीडीच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ एकही कॅमेरा नाही.