आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारी : यात्रा सहा दिवसांवर, चंद्रभागेचे पात्र अजूनही अस्वच्छ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - वारकरी सांप्रदायामधील कुंभमेळा समजला जाणारा आषाढी यात्रेचा सोहळा केवळ चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. चंद्रभागा नदीच्या पात्रात पुरेशा प्रमाणात पाणी नाही. त्याचप्रमाणे नदीपात्राची दुरवस्था पाहवत नाही. तरीही नाईलाज म्हणून वारकरी सध्या याच नदीपात्रातील पाण्यात पवित्र स्नान करून समाधान मानत आहे.
आषाढी यात्रेच्या तोंडावर सध्या प्रशासनाकडून शहरातील विविध रस्त्यांची दुरुस्ती, शौचालयांची उभारणी आदी कामे सुरू असल्याचे दिसत आहे. यामध्येच चंद्रभागा वाळवंटात अद्यापही स्नान करण्याइतपत पाणी नाही. चंद्रभागेच्या वाळवंट स्वच्छतेचा पालिकेकडून ठेका दिला आहे. परंतु वाळवंटात कमालीचे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एरव्ही अस्वच्छ असणारे हे पात्र यात्राकाळात तरी स्वच्छ केले जावे, अशी अपेक्षा आहे. आषाढी एकादशीपर्यत तरी पवित्र चंद्रभागा नदीचे वाळवंट स्वच्छ होईल का ? असा सवाल भाविकांमधून केला जात आहे.

फोटो - पंढरपूर. नदीची दुरवस्था, सगळीकडे घाणीचे साम्राज्य तसेच डबक्याप्रमाणे वाहणा- या चंद्रभागेचे पवित्र स्नान करताना वारकरी. छाया. राजू बाबर