आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सफाई कर्मचाऱ्यांसाठी पंधरा दिवसांत साहित्य खरेदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकासफाई कर्मचारी राम नाईक ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून मरण पावले. योग्य साहित्य सोबत नसल्याने हा अपघात घडला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने साहित्य खरेदीच्या हालचाली सुरू केल्या. पुण्याहून एका कंपनीचे साहित्य खरेदी करण्यात येणार असून, त्या कंपनीच्या वतीने साहित्याचे प्रात्यक्षिक सोमवारी महापालिका आयुक्त दालनात दाखवण्यात आले. त्यापैकी काही साहित्याची निवड करण्यात आली. ते पंधरा दिवसांत येतील, अशी माहिती अंबऋषी रोडे यांनी दिली.
टी. के. एंटरप्रायजेसचे फारूक पटेल यांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कक्षात साहित्याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी अप्पर आयुक्त विलास ढगे, अंबऋषी रोडे आदी उपस्थित होते.
हे होते साहित्य : हेल्मेट,हेड टाॅप, बूट, हँडग्लोज, बेल्ट, कृत्रिम श्वासोच्छवास यंत्र, मास्क.
कृत्रिमश्वासोच्छवासाचे यंत्र :
सफाईकर्मचारी ड्रेनेज चेंबरमध्ये १० फूट खाली गेल्यावर त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देणे आवश्यक आहे. ते महापालिका खरेदी करणार आहे. ते लिटरची टाकी असून, ते ४५ मिनिट श्वास देऊ शकते.
पंधरा दिवसांत साहित्य
- सफाईकर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. काही साहित्याची निवड केली. पंधरा दिवसांत साहित्य उपलब्ध.'' अंबऋषीरोडे, सार्वजनिकआरोग्य अभियंता