आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकर जयंतीः पावणेचारशे मंडळांचा सहभाग, पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यघटनेचेशिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आजपासून सुरू होत आहे. सुमारे पावणेचारशे मंडळे उत्सव साजरा करणार आहेत.
शिवाजी चौक, सम्राट चौक ते रूपाभवानी या मार्गावर काही मंडळांनी मंडप उभारले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी फौजदार चावडी, जोडभावी पोलिस अथवा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस नेमून वाहतूक नियोजन करण्याची गरज आहे. पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यासाठी सूचना दिल्यास वाहतूक अडथळा होणार नाही. याबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त महिपती इंदलकर यांना विचारले असता, स्थानिक पोलिसांची परवानगी घेऊन मंडप टाकलेत. वाहतूक अडथळा होत असल्यास त्याठिकाणी आम्ही पोलिस पॉइंट देऊन नियोजन करू.
पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील म्हणाले की, महापालिकेची पूर्वपरवानगी घेऊन मंडप टाकण्यात आलेत. वाहतूक नियोजनासाठी आमचे पथक नियोजन करेल.
पोलिसांचाचोख बंदोबस्त
पोलिसप्रशासनाकडून सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षक, फौजदार, पोलिस कर्मचारी, राज्य राखीव दल (एसआरपीएफ) पोलिसांसह सुमारे पाचशे पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी राहील. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांचा बंदोबस्त वेगळा आहे. ठिकठिकाणी पोलिस नियुक्तीचे नियोजन आहे. तसेच पथकांची रचना आहे.
- सफाई मोहीमेत सामील महापौर सुशीला आबुटेंसह अन्य पदाधिकारी, कर्मचारी.
मिरवणूक मार्गावरून पाच टन कचरा साफ
सोलापूर- डॉ.आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मिरवणूक मार्गाची स्वच्छता मोहीम हाती घेतली. यात महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, भीमप्रेमींसह नागरिक सहभागी होते. पाच किमी रस्त्यावर सुमारे पाच टन कचरा उचण्यात आला. सकाळी ९.३० ते दुपारी १२ अशी अडीच तास सफाई मोहीम चालली.

आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्या संकल्पनेतून मोहीम राबवण्यात आली. डॉ. आंबेडकर चौकात महापौर सुशीला आबुटे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. या वेळी उपमहापाैर प्रवीण डोंगरे, स्थायी समिती सभापती पद्माकर काळे, सभागृह नेता संजय हेमगड्डी, विरोधी पक्षाचे नगरसेवक कृष्णहरी दुस्सा, नगरसेवक शिवलिंग कांबळे, बाबा मिर्स्त्रंी, आनंद चंदनशिवे, आरिफ शेख, सुनीता रोटे, राजा इंगळे, राजा सरवदे, अॅड. संजीव सदाफुले, बाळासाहेब वाघमारे आदी उपस्थित होते. डफरीन चौक, जुना एम्प्लाॅयमेंट चौक, फाॅरेस्ट, रेल्वे स्टेशन, मेकॅनिक चौक या मार्गावर मोहीम राबवण्यात आली.

सम्राट चौक ते रूपा भवानी मागार्वर रस्त्यातच मंडप टाकला आहे. वाहनांसाठी रस्ता नसल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मार्गावर मनपाकडून स्वच्छता मोहिम राबवल्याने मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांचे मनपा सभागृहात नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी अभिनंदन केले. जयंती मार्गावर योग्य त्या सुविधा द्यावे तसेच फिरते शौचालय ठेवावे असा आदेश महापौर सुशीला आबुटे यांनी दिला.
शहरात इतरत्र राबवावी
महापालिकेनेडॉ. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने केलेल्या स्वच्छता मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले, तर अशा प्रकारची मोहीम महापालिकेच्या बागा, महापालिकेच्या शाळा आणि परिसर तसेच प्रभागात राबवावी, अशी अपेक्षा या वेळी काही नागरिकांनी व्यक्त केली. तिथेही कमालीची अस्वच्छता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.