आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण तहसील कार्यालयात लिपिकाचा काम करताना मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत कार्यालयीन काम करत असलेले लिपिक प्रशांत शत्रुघ्न रेस (वय 28) यांचा शुक्रवारी अकस्मात मृत्यू झाला. लिपिक रेस हे दुपारी चार वाजता कार्यालयात आले. त्यांच्याकडे वेतन निश्चितीचे कामकाज होते. त्यामुळे संगणकावर काम करत होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कार्यालयातील इतरांना त्यांची मान एकीकडे कलंडलेली दिसून आली. तातडीने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेसंदर्भात दक्षिणच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या, प्रशांत रेस व इतर सर्वच कर्मचारी कार्यालयात कामासाठी उपस्थित होते. मी कुडल संगम येथे होते. कार्यालयातील उपस्थित सहकार्‍यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल केले. काम जास्त होते, मात्र ताण होता असे म्हणता येणार नाही.

कामाचा ताण खूप असल्याचे त्याने वेळोवेळी सांगितले. त्याला उशिरापर्यंत काम करावे लागत होते. मात्र, त्याच्या मृत्यूबाबत नातेवाईकांना खूप उशिरा कळवले गेले. श्रीनिवास रेस, चुलतभाऊ