आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिज्ञासेमुळे झाले ‘ते’ घड्याळाचे डॉक्टर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मीना चित्रपटगृह असो, फलटणच्या राजवाड्यातील मनोरा असो किंवा रेल्वे स्टेशन असो; येथील घड्याळांच्या दिलाची धडकन थांबली की हमखास एका ‘डॉक्टरा’स बोलावण्यात येते. ते म्हणजे येथील गंगाधर येरनाळ. गेल्या 37 वर्षांपासून ते घड्याळ दुरुस्तीचे दुकान चालवत आहेत. चावीचे इवलेसे मनगटी घड्याळ ते मनोर्‍यातील भल्यामोठय़ा घड्याळांची दुरुस्ती त्यांनी केली आहे
शाळेत असताना वडिलांनी त्यांना मनगटी घड्याळ दिले. टिकटिक चालते कशी या जिज्ञासेपोटी येरनाळ यांनी घड्याळ उघडले. त्यानंतर असे प्रयोग सारखे होत राहिले. या प्रयोगांनी त्यांना घड्याळाचे तंत्र लक्षात आणून दिले. कन्नड माध्यमातील दहावी झाल्यानंतर ते मेकॅनिकी चौकातील भारत वॉच कंपनीत कामास लागले. तेथे त्यांनी दुरुस्तीचे अधिकृत धडे गिरवले. त्यानंतर स्वत:चे दुकान सुरू केले.
भोगिशयन, शिंदे यांच्याही घड्याळांची दुरुस्ती
1973मध्ये विद्यमान केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडील एचएमटीचे मनगटी घड्याळ बंद पडले. अँड. कल्याणराव हिप्परगे यांच्यामार्फत ते गंगाधर येरनाळ यांच्याकडे आले, तर 1996 मध्ये शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू के. भोगिशयन यांच्या वडिलांचे एक घड्याळ गौतमशेठ सुराणा यांच्या सांगण्यावरून त्यांनी दुरुस्त केले. पोलिस आयुक्तांच्या कक्षात अक्कलकोट संस्थानच्या राजाने भेट दिलेले मोठे घड्याळ आहे. ते त्यांनी 2002 मध्ये दुरुस्त केले. पुणे मिलिटरी कंटोनमेंटमधील रोलेक्स कंपनीचे तसेच पुण्यातील बरीच मनोर्‍यावरील घड्याळे, पंढरपूर विठ्ठल मंदिरातील, सोळा जिल्हाधिकारी, न्यायाधीश व वकील मंडळींची घड्याळे त्यांनी दुरुस्त केली आहेत.