आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cm Chavan Visit Delhi And Sushilkumar Shinde Also

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्रीही सोनिया दरबारी, सुशीलकुमारांना दिल्लीत पाचारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेत अग्रस्थानी नाव असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोमवारी कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत पाचारण केले आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, त्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते हजेरी लावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात नेतृत्वबदलाच्या चर्चा जोरात रंगल्या आहेत. शनिवारी मुख्यमंत्री चव्हाण यांनी नेतृत्वबदलाचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी या विषयावरील चर्चेला अजून पूर्णविराम मिळालेला नाही. चव्हाण यांच्या जागी सुशीलकुमार शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी शिंदे दिल्लीला जात असल्याने तेथे कोणत्या घडामोडी होतात याकडे लक्ष लागले आहे. स्वत: शिंदे यांनीही दिल्लीला जाणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.