आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुरवठ्यातील दोष दूर करा, समस्या ५० टक्क्यांनी संपेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरात नागरिकांना पुरेल इतके पाणी आहे. मात्र, वितरण व्यवस्था नाही. ती जुनी आहे. त्यातील दोष दूर केला तर पाण्याची ५० टक्के समस्या संपेल. त्यामुळे वितरण व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करा, पाणीपुरवठ्याचा आराखडा तयार करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात फडणवीस यांनी शहराच्या विषयांवर आढावा बैठक घेतली. तीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुली, नगरोत्थान योजना, घनकचरा व्यवस्थापन, उजनी जलाशयापासून नवीन समांतर जलवाहिनी योजना आदींबाबत चर्चा झाली. त्याची माहिती फडणवीस यांनी पत्रकारांना दिली. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आदी उपस्थित होते.
सिटी बस सेवेचा परिघ वाढण्याबाबत अहवाल मागू
सिटीबस सेवेचा परिघ वाढवून शहरापासून ४० किलोमीटर करण्याचा प्रस्ताव महापालिकेने दिला आहे. यामुळे परिवहनचे उत्पन्न वाढणार आहे. याबाबत परिवहन विभागाकडून अहवाल मागण्यात येईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल.
‘नगरोत्थान’ योजनेसाठी राज्य सरकार मदत करेल
सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत महापालिका मलनिस्सारण व्यवस्था करणार आहे. तीन केंद्रे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे १३१ कोटींची मागणी केली आहे. या बाबत आवश्यक ती मदत करण्यात येईल.
बैठकीतील उपस्थित अधिकारी
मनपाआयुक्त विजयकुमार काळम-पाटील, महापौर प्रा. सुशीला आबुटे, मनपा स्थायी समिती पद्माकर काळे, विरोधी पक्षनेता कृष्णहरी दुस्सा, उपायुक्त श्रीकांत म्याकलवार, नगर अभियंता गंगाधर दुलंगे आदी अधिकारी.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ...तर तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी
बातम्या आणखी आहेत...