आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Co Operative Society Director FIR Issue In Solapur

पतसंस्थांच्या दोषी संचालकांवर पुन्हा गुन्हे नोंदवण्यात येतील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्ह्यातील अडचणीतल्या पतसंस्थांच्या लेखापरीक्षणाचे काम सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर दोषी संचालकांवर पुन्हा गुन्हे नोंदवण्याचे काम हाती घेऊ, अशी माहिती सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी दिली.

काही संस्थांच्या संचालकांवर यापूर्वी गुन्हे नोंदले गेले; परंतु ठेवरकमा परत देण्याच्या अटीवर त्यांची मुक्तता झाली. या अटीची पूर्तता नाहीच; उलट त्यांच्याकडील थकीत रकमांची वसुलीही होत नाही. अशा स्थितीत त्यांच्यावर पुन्हा फौजदारी खटले दाखल करण्यासाठी संबंधित पतसंस्थांच्या लेखापरीक्षणाचे काम महत्त्वाचे होते. त्यानुसार दोषींवर जबाबदारी निश्चित करणे, त्यांची मालमत्ता जप्त करणे, त्याच्या लिलावातून ठेवीदारांच्या रकमा देणे असा कार्यक्रम सप्टेंबरनंतर सुरू होईल. त्याबाबतच्या सूचना संबंधित तालुक्यांच्या सहायक उपनिबंधकांना दिल्या आहेत, असेही श्री. लावंड म्हणाले.

बारलोणी येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील पतसंस्था, महात्मा फुले पतसंस्था, संत रोहिदास पतसंस्था आणि मोहोळची प्रियदर्शिनी पतसंस्था या संस्थांमध्येच ठेवीदार मोठय़ संख्येने आहेत. त्यामुळे तेथील उपनिबंधकांना कटाक्षाने काम करण्याच्या सूचना केल्या, असे श्री.लावंड म्हमाले.

सहकारमंत्र्यांचे निर्देश
सहकार मेळाव्यासाठी राज्याचे सहकार आणि संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील सोलापूरला आले होते. त्या वेळी अण्णा हजारेप्रणीत जनआंदोलनाने सहकार खात्याच्या विरोधात निदर्शने केली. त्यांच्या शिष्टमंडळाने श्री. पाटील यांची भेटही घेतली. त्या वेळी संबंधित पतसंस्था आणि ठेवीदारांच्या बैठका घेण्याची सूचना त्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर या आढावा बैठकांकडे पाहिले जात आहे.

ता. 26 : दुपारी 1 : महात्मा फुले पतसंस्था, बारलोणी
दुपारी 4 : संत रोहिदास पतसंस्था, बारलोणी

सोलापुरात 26, 27 सप्टेंबरला बैठका
पतसंस्थांच्या लेखापरीक्षणाचे काम, थकबाकीची वसुली आणि ठेवीदारांच्या रकमांचे वाटप याबाबतच्या आढावा बैठका 26 आणि 27 सप्टेंबरला आयोजित केल्या आहेत. सोलापुरातील विसजिर्त उद्योग बँकेत या बैठकांचे नियोजन झाले.

‘एआर’ना नोटिसा
अडचणीतील पतसंस्थांच्या कामकाजाकडे दुर्लक्ष करणार्‍या तालुका साहाय्यक निबंधकांना नोटिसा बजावून खुलासा मागितला. बर्‍याच उपनिबंधकांनी याबाबतच्या कामात कुचराई केली. त्यामुळे ठेवीदारांची ओरड सुरूच आहे. आढावा बैठकांमध्ये अशा उपनिबंधकांना सक्त सूचना देण्यात येतील.
- बी. टी. लावंड, जिल्हा उपनिबंधक

ता. 27 : दुपारी 12.30 : सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील पतसंस्था, बारलोणी
दुपारी 3.30 : प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतसंस्था, मोहोळ