आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोरे, राऊत यांची बदली; लावंड नवे डीडीआर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे आणि शहर उपनिबंधक संजय राऊत यांची शुक्रवारी बदली झाली. श्री. राऊत यांना जळगावच्या जिल्हा उपनिबंधकपदी बढती मिळाली. मोरे यांना कुठलेच पद दिले नाही. त्यांच्या पदाची घोषणा स्वतंत्ररीत्या करण्यात येईल, असे सहकार खात्याच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. लातूर विभागीय कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक बी. टी. लावंड हे सोलापूर जिल्ह्याचे नवे उपनिबंधक म्हणून येतील. शहर उपनिबंधकपदी कोल्हापूरचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) बी. एस. कटरे येणार आहेत.

सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग खात्यातील अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. श्री. मोरे 2009 पासून जिल्हा उपनिबंधकपदी होते. जिल्ह्यात अडचणीतल्या पतसंस्थांमध्ये ठेवीदारांच्या रकमा अडकल्या. संचालक मोकळे सुटले. संस्थांवरील प्रशासकीय मंडळ निष्क्रिय ठरले. अशा स्थितीवर र्शी. मोरे यांनी वेळीच ठोस कारवाई केली नाही.

अलीकडेच संबंधित अधिकार्‍यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारला होता. परंतु त्यांची बदलीच झाली. विसजिर्त सोलापूर जिल्हा औद्योगिक बँकेवर अवासायक (लिक्विडेटर) म्हणूनही त्यांनी काम पाहिले. या बँकेच्या दोषी संचालकांवर सहकार कायद्याच्या कलम 88 अन्वये जबाबदारी निश्चित करण्यात आली. चौकशी अधिकार्‍यांनी फौजदारी खटले दाखल करण्याची शिफारसही केली. परंतु र्शी. मोरे यांच्या कारकिर्दीत कुठलीच कारवाई झाली नाही. र्शी. राऊत यांनी विसजिर्त सोलापूर नागरी औद्योगिक बँकेतील 81 हजार ठेवीदारांच्या सुमारे 45 कोटी रुपयांच्या रकमा मिळवून देण्यात यशस्वी ठरले. येथील हातमाग संस्थांतील बोगसगिरीही त्यांनी उघड केली.