आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचारसंहिता आणि जागा वाटपाकडे लागले लक्ष, गणेशोत्सवामुळे आचारसंहिताही लांबली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ऐनसण, उत्सवाच्या काळातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. दिवाळीच्या फटाक्याबरोबर विजयाचा जल्लोश करण्याची संधी राजकारण्यांना मिळणार अशीच चिन्हे दिसत असली तरी गणेशोत्सवाच्या धामधुमीमुळे आचारसंहिता लांबली आहे, तर जागा वाटपही जाहीर झालेले नाही. त्यामुळे जागा वाटप आणि अचारसंहिता याकडेच लक्ष लागले आहे.

गणरायाच्या आगमनाअगोदरच निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल अशी चर्चा रंगली होती. प्रशासनाची त्यादृष्टीने तयारीही झाली आहे. मात्र ती आता लांबली आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ती जाहीर होईल, असे आता सांगितले जात आहे. मात्र, निश्चित तारखा समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात कधीही निवडणूक जाहीर होऊ शकते अशा तयारीने वेग घेतला आहे.

दुसरीकडे इच्छुकांनी आपण आता इथले उमेदवार म्हणून गुडघ्याला बाशिंगे बांधली आहेत. पण प्रत्यक्षात आघाडी वा महायुतीचे जागा वाटप जाहीर झालेले नाही, त्यामुळे राजकीय अस्वस्थता वाढून पक्षांतर, इच्छुकांच्या हालचालींवरही आता मर्यादा आल्या आहेत. कोणत्या जागेवर कोण लढणार, आघाडी होणार की नाही यावर राजकीय वर्तुळात मत मतांतरे प्रचंड आहेत. त्या गदारोळात पक्ष मात्र निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. नेहमीप्रमाणे काँग्रेसने निवडणूक प्रचारपूर्व बैठकांना सुरुवात केली आहे. भाजपची ‘वेगळी’ यंत्रणाही कामाला लागली आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील राजकीय स्थिती उत्सुकता ताणणारी आहे. कोण कोणाविरुध्द लढणार? याच्याच चर्चा जास्त आहेत. कोण कोणत्या पक्षातून लढणार याचीही उत्सुकता लागली आहे.

काँग्रेसमध्ये अदला- बदलीची शक्यता
जिल्ह्यातीलकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बार्शी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन त्या बदल्यात पंढरपूर घेण्याचा विचार चालू आहे. शहर उत्तर मतदारसंघही राष्ट्रवादी काँग्रेसला हवा आहे. मात्र ती आदलाबदल करणे कठीण असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. मात्र काही जागांवर आदला-बदल होईल, असे काँग्रेसमधील सूत्राकडून सांगितले जात आहे.

महायुतीत तीन जागांवर वाद
महायुतीमध्येमोहोळ मतदारसंघ रिपाइं मागत आहे, तर दक्षिण सोलापूर भाजप मागत आहे. पंढरपूरमध्ये स्वाभीमानी शेतकरी संघटना, माळशिरसमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा दावा आहे. यापैकी दक्षिण सोलापूर, सांगोला पंढपूर या ठिकाणी वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.