आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्ग कार्यालयावरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राष्ट्रीय महामार्गाचे विभागीय कार्यालय सोलापुरातून कोल्हापूरला पळवण्यात आले. दिव्य मराठीने यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर मात्र काँग्रेस आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींनी एकमेकांकडे बोट दाखवायला सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात कार्यालय पळवले गेल्याचे भाजप खासदार शरद बनसोडे यांनी सांगितले तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार बनसोडे आदी भाजप लोकप्रतिनिधींमुळे कार्यालय कोल्हापूरला पळवले गेल्याचा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता संघटनेने बुधवारी बैठक घेऊन आंदोलन उभे करण्याचा निर्धार केला आहे.

सोलापूर विभागीय कार्यालयांतर्गत हैदराबाद नाका ते रेल्वे स्टेशन कि.मी., बाळे ते स्टेशन कि.मी., स्टेशन ते सोरेगाव कि.मी., तुळजापूर ते अक्कलकोट ५० कि. मी., धर्मपुरी ते कुरूल मोहोळ मार्ग १८० कि. मी., कुरुल ते मंद्रूप २५ कि. मी., अकलूज ते सांगोला ८५ कि. मी. असे एकूण सुमारे ४०० किलोमीटरपर्यंत रस्त्यांचे काम केले जात होते. ही कामे सुमारे दीडशे ते दोनशे मक्तेदारांकडून, दीड हजार कामगारांकडून होत होते. आता सर्वांच्या हाताचा रोजगार हिरावला जाऊ शकतो, अशी भीती आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
जिल्हा सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता असोसिएशनने दुपारी वाजता समाजकल्याण येथे बैठक घेतली. जुलैला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय झाला. मिलिंद भोसले, कांतिलाल डुबल, कैलास लांडे आदी पदाधिकारी होते.
अनेक कार्यालये इतरत्र
मुंबई, पुणे, नाशिकनंतर सोलापूर हे राज्यात चौथ्या क्रमांकाचे शहर होते. येथे औद्योगिक केंद्र मोठे असताना एमआयडीसीचे विभागीय कार्यालय सांगलीत आहे. सहधर्मादाय आयुक्तांचे कार्यालय लातूरला आहे.
वर्षापूर्वी कार्यालय कोल्हापूरला पळवले
- माझ्या मते वर्ष - दीड वर्षापूर्वीच राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय कोल्हापूरला हलवल्याचे समजते. याची अधिक माहिती घेतो, जर अडीच तीन महिन्यापूर्वी हे कार्यालय हलवले असेल तर मंत्र्यांना भेटून ते सोलापूरला आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेन.”
सुभाष देशमुख, आमदार
कोठे नेऊन ठेवताहेत सोलापूर माझा
- राष्ट्रीय महामार्गचे विभागीय कार्यालय कोल्हापूरला हलवण्यात आले आहे. या घटनेला भाजपचे खासदार शरद बनसोडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख हेच जबाबदार आहेत. कुठे नेऊन ठेवताहेत सोलापूरला अशी म्हणायची वेळ सध्या आली आहे.”
प्रणिती शिंदे, आमदार
पूर्वी एवढे अधिकार ठेवायला लावू
- हा निर्णय काँग्रेसच्या काळात झालेला आहे. मी सध्या दिल्लीत आहे. याविषयी गडकरीसाहेबांशी बोललो. दिव्य मराठीचा अंक ऑनलाइन पाहिला. विभागीय कार्यालयात जेवढे अधिकार होते तेवढे अधिकार सोलापूरच्या सब डिव्हिजनमध्ये ठेवायला लावू.”
अॅड. शरद बनसोडे, खासदार