आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिवचिवाट वाढवण्यासाठी हवा सर्वांचा पुढाकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘एक घास चिऊचा..’ ‘चिमणे चिमणे दार उघड..’ या सारख्या गोष्टी एकतच आपण मोठे झालो. पहाट होताच चिमण्यांचा चिवचिवाट वातावरणात स्फूर्ती आणतो. त्यांच्या मंजूळ किलबिलाटाने मन प्रसन्न होते. अशी ही चिमणी प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक होती. पण, बदलते वातावरण, बेसुमार वृक्षतोड, कोंदट झालेली फ्लॅट संस्कृती व जिवघणे प्रदूषणामुळे चिमणी आपल्यापासून भुर्र.. उडत चाचली आहे. त्यांचे प्रमाण खूप कमी होत आहे. आपल्या शहरात गेल्या 10 वर्षांत चिमण्यांचे प्रमाण 30 ते 35 टक्क्यांनी कमी झाल्याचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सर्वेत पुढे आले आहे.

या चिमण्या गेल्या कुठे : शहराच्या पूर्व भागातील विणकार बागेत एकेकाळी चिमण्यांची मोठी गर्दी असायची. देगाव, रामलाल चौक, नेहरू नगर परिसरातील झाडांवर हजारो चिमण्या असायच्या. आता ही संख्या शेकडोंवर आली आहे.

चिमणी संवर्धनासाठी धडपड
अप्पा कलंत्री हे गेल्या दीड वर्षांपासून सकाळी सिद्धेश्वर मंदिरात चिमण्यांना तांदूळ टाकतात. चिमण्यांबरोबर ब्राह्मी मैना, साळुंकी, पारवे, खारूताई मेजवानीसाठी येतात. मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील ब्राह्मीण गल्लीत आठ वर्षांपासून पाखरांसाठी पाणपोई सुरू आहे.

गॅलरीत ठेवा धान्य-पाणी
गॅलरीत किंवा खिडकीच्या एका कोपर्‍यात एका वाटीत धान्य ठेवायला हवे. चिमण्यांना याची माहिती मिळताच त्या नियमितपणे तेथे दाणे खाण्यासाठी येतात. तसेच, वाटीत पाणी भरून ठेवावे.

चिमण्यांवर करा प्रेम
सर्वांनी पुन्हा एकदा चिमण्यांवर मनस्वी प्रेम करावे. घराच्या परिसरात चिमणचारा, पाण्याची सोय केल्यास त्या पुन्हा अंगणात बागडू लागतील.’’ किशोर ठाकरे, उपवनसंरक्षक

शालेय विद्यार्थ्यांमध्ये चिमण्यांना आसरा देण्याची शिकवण द्यावी. फळांच्या लाकडी पेट्या, मिठाईच्या बॉक्सपासून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करण्याचे प्रशिक्षण द्यावे.’’ डॉ. अरविंद कुंभार, पक्षीमित्र अकलूज