आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ जोडपी बांधली रेशीम बंधनात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : विडीघरकुल येथील वैष्णवी देवी नवरात्र बहुउद्देशीय संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने बुधवारी आयोजित केलेला सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये नऊ जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधण्यात आल्या.
प्रारंभी पहाटे ज्ञानेश्वर एक्कलदेवी महाराज यांच्या हस्ते काकडा आरती करण्यात आली. सकाळी वाजता पंचमुखी देवनस्थान येथून जलकुंभ मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२.२५ वाजता अक्षता सोहळा पार पडला. या सोहळ्यात नऊ जोडपे विवाहाच्या बंधनात अडकले. दुपारी जेवणानंतर सर्व वधू-वरांची रिक्षामधून विडी घरकुल येथून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी घरकुलवासीयांनी रस्त्यावर दुतर्फा गर्दी केली होती. विवाह सोहळ्याप्रसंगी माजी महापौर महेश कोठे, नगरसेवक विठ्ठल कोटा, नगरसेविका निर्मला नल्ला, श्रीकांत गुर्रम, मारुती नल्ला आदींची प्रमुख उपस्थिती होती. विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
विडी घरकुल येथील वैष्णवी देवी नवरात्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित सामुदाियक विवाह साेहळ्या वधू-वर.