आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी कार्यालय स्वच्छतेसाठी मक्तेदार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जिल्हाधिकारी कार्यालय परिसर स्वच्छतेसाठी तातडीने निविदा प्रक्रियेद्वारे ठेकेदाराची नियुक्ती करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिला.

कचरा, मोकाट जनावरे, तुंबलेली स्वच्छतागृहे यामुळे पसरलेली दुर्गंधी, गुटखा, तंबाखूच्या पिचकारीने रंगलेल्या भिंती, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची टंचाई अशा विविध समस्यांच्या विळख्यात कार्यालय आहे. जिल्हाधिकारी कार्यालय घाणीच्या विळख्यात असल्याचे वृत्त गुरुवारी ‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेऊन स्वच्छतेचा आदेश देण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्वच्छता करण्यात येत होती. पण, दीड वर्षांपूर्वी शासन निर्णयात झालेला बदल पुढे करत बांधकाम विभागाने स्वच्छतेच्या कामातून हात झटकले. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागानेस्वच्छतेसाठी निविदा घेऊन एका ठेकेदाराची नियुक्ती केली. प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागांकडून स्वच्छतेसाठी पैसे घेऊन काम सुरू होते. काही कार्यालयांकडून स्वच्छतेचे पैसे मिळत नव्हते. त्यामुळे आर्थिक ताण वाढल्याने काम बंद पडले. गेल्या सहा महिन्यांपासून कार्यालय परिसराची स्वच्छता झाली नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून शहर व ग्रामीण भागातून कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणार्‍या नागरिकांची गैरसोय होत आहे.

लवकरच निविदा प्रक्रिया
जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता करण्याची पूर्वीची यंत्रणा बंद आहे. स्वच्छतेसाठी त्वरित निविदा प्रक्रिया काढून परिसर स्वच्छ ठेवण्याचा आदेश देण्यात आले असून त्याची अंमलबजावणी लवकरच होईल पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी

पार्किंगला शिस्तीची गरज
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पार्किं ग व्यवस्थेला शिस्त नाही. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लावण्यात येणार्‍या वाहनांमुळे सेतू सुविधा केंद्रात ये-जा करणार्‍यांना अडथळा होतो. तसेच, दक्षिण तहसील कार्यालयाच्या समोर टपरी, हातगाडीवाल्यांची गर्दी असल्याने मध्यवर्ती इमारतीकडून येणार्‍या वाहनांची कोंडी होते. तसेच, चोर्‍यांचे प्रकार टाळण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची आवश्यकता आहे.

शाळा, कॉलेजसमोर वाहनांची गर्दी हटविण्यासाठी मुख्याध्यापक व प्राचार्यांना पत्र देणार आहे. रंगभवन चौकात एसटीबस थांब्यामुळे होणारा वाहतूक खोळंबा, मुख्य रस्त्यावर कोपर्‍यावर थांबणारी रिक्षा, अँपेरिक्षा यावर कारवाई मोहीम आहे. नो-पार्किंग झोन, सम-विषम तारखेस वाहने लावणे याबाबत उपाययोजना आहे.

वाहतुकीला शिस्त लावणारच
वाहतुकीच्या शिस्तीविषयी जनजागृती, नागरिकांशी संवाद साधणार आहे. बदल होण्यासाठी महिना-दोन महिने लागतील. पण, कायमस्वरूपी प्रयत्न करणार असून नागरिकांनीही सहकार्य करावे. नागरिकांना काही सूचना किंवा माहिती द्यायची असल्यास थेट मोबाईल क्रमांक 9420100030वर संपर्क करा.’’ मोरेश्वर आत्राम, साहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा