आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांदूळवाडीत गेडाम गुरुजींनी घेतली शाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सकाळी 10.20 ची वेळ., शिक्षकांची परिपाठसाठी विद्यार्थ्यांना जमा करण्याची गडबड., काही शिक्षक सह्या करण्यासाठी मुख्याध्यापकांच्या खोलीत गेलेले.., अशातच जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांची गाडी तांदूळवाडी (ता. दक्षिण सोलापूर) शाळेत दाखल झाली आणि त्यांनी परिपाठास उपस्थिती लावली. त्यानंतर थेट पहिलीच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना धडे दिले. एरव्ही प्रशासकीय कामात तत्परता दाखवणारे जिल्हाधिकारी डॉ. गेडाम गुरुजींच्या भूमिकेतही समरस झाले. निमित्त होते जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता तपासणीचे.

या शाळेत जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी दुपारी 2.20 पर्यंत तपासणी केली. त्यांनी परिपाठास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. त्यानंतर थेट पहिलीचे वर्ग गाठले. त्यांनी विद्यार्थ्यांना जवळ घेत प्रश्‍न विचारले आणि त्यामुळे विद्यार्थीही बोलते झाले. या वेळी एका अंध व अपंग विद्यार्थ्याची आस्थेवाईकपणे चौकशी करीत त्याच्यावरील उपचाराची माहिती घेतली. यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गुणवत्ता चांगली आहे. परंतु शिकवण्यात फरक असल्याने मुले मागे असल्याची कबुली जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी दिली.