आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञानासाठीच्या 601, तर वाणिज्यच्या 973 रिक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - काही कनिष्ठ महाविद्यालयांत विज्ञान शाखेच्या तब्बल 601 जागा रिकामा राहिल्या आहेत. वाणिज्य शाखेची स्थिती त्याहीपेक्षा वाईट असून 973 जागा रिकामा आहेत. सर्वच महाविद्यालयांत कलाशाखेच्या काही जागा रिक्त आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाने बुधवारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक घेतली. त्यातून ही माहिती पुढे आली आहे.

वालचंद महाविद्यालयात ही बैठक झाली. शिक्षणाधिकारी विद्या शिंदे यांनी आढावा घेतला. या वेळी उपशिक्षणाधिकारी अशोक भांजे, शिक्षण उपनिरीक्षक सूर्यकांत सुतार आदी उपस्थित होते.

...तरीही पालकांचे खेटे
‘वालचंद’, ‘संगमेश्वर’ व ‘दयानंद’ या तिन्ही महाविद्यालयांतील विज्ञान व वाणिज्यच्या जागा पूर्ण भरल्या आहेत. तरीही पालक येथे प्रवेश मिळण्यासाठी खेटे घालत आहेत. दरम्यान, गुणवत्ता यादीनुसार प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नजीकच्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी विद्या शिंदे यांनी केले आहे.


उपस्थिती 90 टक्के करावी
विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असते. विद्यार्थी महाविद्यालयांत केवळ नाव नोंदवितात, बाहेर तीन-तीन शिकवण्या लावतात. शिक्षण पद्धतीतील ही त्रुटी लक्षात घेऊन किमान 90 टक्के उपस्थिती आवश्यक करावी.’’ केशव शिंदे, सुशय गुरुकुल

अचानक पडताळणी
बनावट उपस्थितीच्या शोधासाठी यंदापासून माध्यमिक विभाग अचानक पडताळणी करणार आहे. हजेरीपत्रक पूर्ण भरलेले नसणे किंवा विद्यार्थी अनुपस्थित असूनही त्याची उपस्थिती दाखवल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. गंभीर गैरप्रकार आढळल्यास तुकडीची मान्यता रद्द करण्यात येणार आहे.’’ विद्या शिंदे, शिक्षणाधिकारी, उच्च् माध्यमिक विभाग

रिक्त जागांचे काय?
शासकीय तंत्रनिकेतला प्रवेश मिळाल्यास अनेक गुणवंत विद्यार्थी अकरावी प्रवेश रद्द करतात हा दरवर्षीचा अनुभव आहे. या रिक्त जागांवर प्रवेश देण्याचा अधिकार या वर्षी त्या त्या महाविद्यालयांच्या संबंधित प्राचार्यांकडे देण्यात आला आहे. या जागांवरचे प्रवेश पारदर्शकपणे करण्याची मागणी होत आहे.