आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वालचंद’ 90, ‘संगमेश्वर’ 89, ‘दयानंद’ 83 टक्के

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी सोमवारी सकाळी दहाला महाविद्यालयांत जाहीर झाली. यादीतील गुणवतांनी आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्याची लगबग सुरू केली. वालचंद व संगमेश्वर महाविद्यालयांत गुणवत्ता यादी पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. ‘वालचंद’मध्ये अनुदानितच्या 480 तर विनाअनुदानित तुकडीच्या 120 अशा एकूण 600 जागा आहेत. ‘संगमेश्वर’ व ‘दयानंद’मध्ये 480 जागा आहेत.

‘वालचंद’मध्ये 90.18 टक्के, ‘संगमेश्वर’मध्ये 89.45 तर ‘दयानंद’मध्ये 83 अशी कट ऑफ लिस्ट होती. पहिल्या यादीतील सर्वच जागा भरल्या जात नसल्याने संगमेश्वर महाविद्यालयाने 240 जणांची वेटिंग लिस्ट लावली. एका दिवसात आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले होते. वाणिज्य शाखेसाठी पहिली कट ऑफ लिस्टमध्ये संगमेश्वर मध्ये 68.40 टक््के तर हिराचंद नेमचंदमध्ये 72 टक्के होती. तीनही महाविद्यालयांत मागेल त्या विद्यार्थ्याला कला शाखेला प्रवेश आहे.

3 जुलैला बीजभाषण
संगमेश्वर महाविद्यालयात बुधवारी (3 जुलै) रोजी सकाळी 11 वाजता सायन्स, दुपारी 12 वाजता वाणिज्य व 1 वाजता कला शाखेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य डॉ. राजन अन्यापनावर यांचे बीजभाषण होईल, अशी माहिती उपप्राचार्य व्ही. पी. मोरे यांनी दिली.

ओळखपत्र अनिवार्य
वालचंदमध्ये 10 जुलै रोजी प्राचार्यांचे बीजभाषण आयोजिले आहे. वालचंद महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कॉलर आयडी म्हणजे गळय़ातील ओळखपत्र या वर्षापासून अनिवार्य होणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. अजित माणिकशेटे यांनी दिली.