आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुगली 11 वी गुणवत्ता यादी; जागा रिक्तच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी संगमेश्वर, वालचंद आणि दयानंद या तीनही महाविद्यालयात जवळपास सारखीच लागली गेली. त्यामुळे पहिल्या गुणवत्ता यादीनंतरही या महाविद्यालयांमध्ये अकरावी सायन्सच्या सुमारे 500 जागा रिक्त राहिल्या आहेत. दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी सकाळी झळकेल. संगमेश्वर महाविद्यालयात अकरावी सायन्सच्या सुमारे 100 जागा रिक्त आहेत. या महाविद्यालयांत 83 टक्क्यांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला. यामुळे दुसरी गुणवत्ता यादी 80 टक्क्यांपर्यंत येईल, अशी अपेक्षा आहे.

दयानंद महाविद्यालयात अकरावी सायन्सच्या 340 जागा रिक्त आहेत. पहिली गुणवत्ता यादी 85 टक्क्यांपर्यंत लावली गेली होती. यातून 230 जागा भरल्या गेल्या. दुसर्‍या यादीचा कट ऑफ पॉइंट 75.45 टक्के असणार आहे. या महाविद्यालयात अकरावी कलेच्या 280 जागाही उपलब्ध आहेत. त्यामुळे मागेल त्या विद्यार्थ्याला कला शाखेत प्रवेश देण्यात येत आहे, अशी माहिती दयानंदचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांनी दिली.

वालचंद महाविद्यालयातही अशीच परिस्थिती आहे. 150 च्या आसपास जागा भरल्या गेल्या. आता उर्वरित जागांसाठी उद्या दुसरी गुणवत्ता यादी लागेल. पहिली गुणवत्ता यादी 90 टक्क्यांची होती. 82 टक्क्यांपर्यंत दुसरी गुणवत्ता यादी लागू शकेल. मनपसंत महाविद्यालयातील जागा भरल्या गेल्यानंतरच उर्वरित महाविद्यालयांच्या जागा भरल्या जातात, हा नेहमीचा अनुभव आहे. यामुळे पुढील वर्षी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. तरच महाविद्यालय व विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी ससेहोलपट थांबेल.

विनाअनुदानित फॅक्टर
दहावीचा निकाल 75 टक्के इतका खालावला असला तरी गुणवत्ता यादी 90 टक्क्यांपर्यंत उंचावली गेली. याला कारण विनाअनुदानित तुकड्यांना पुरेसे विद्यार्थी प्रवेश घेणे हे उघड गुपित आहे. विनाअनुदानित तुकड्यांमधील जागा भरण्याचे आव्हान सर्वांपुढे असणार आहे. यामुळेच पहिल्या गुणवत्ता यादीतील गुणवत्तेची आकडेवारी फुगवली गेली. दुसरी गुणवत्ता यादीही अशीच असणार आहे. दुसर्‍या यादीतही नाव न लागलेले विद्यार्थी साहजिकच विनाअनुदानितचा विचार करणार. म्हणून विनाअनुदानितच्या तुकड्या भरल्यानंतरच रिक्त जागांची आकडेवारी सामोरी येणार आहे, हे निश्चित.

दयानंद अकरावी सायन्स कट ऑफ लिस्ट दुसरी यादी
जनरल 75.45
एससी 58.40
ओबीसी 66.73
एनटी सी 72 .00
एनटी बी 66.20
व्ही जे 64.40
एसबीसी 79.09