आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयीन तरुणीस पळवून नेऊन लग्नासाठी केली दमदाटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- तुळजापूर रस्त्यावरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणार्‍या तरुणीला दमदाटी करून तिला रिक्षातून पळवून नेले. एका लॉजवर नेऊन विनयभंग करून लग्नासाठी दमदाटी केली. कोर्‍या कागदावर सही घेऊन सोडून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणीने जोडभावी पोलिसांत रविवारी फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवारी दुपारी तुळजापूर रस्त्यावरील गणपती मंदिराजवळ घडली.
मोतीराम गायकवाड, नामदेव गाडे, वकील तानाजी शिंदे, अनोळखी एक तरुण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप त्यांना अटक नाही. ती तरुणी महाविद्यालयात परीक्षा देऊन रिक्षात बसली होती. त्यावेळी गाडे व शिंदे आले. तिला रिक्षातून उतरवून तू गायकवाड सोबत लग्न कर असे म्हणून जबरदस्तीने दुसर्‍या रिक्षातून शिवशक्ती लॉजमध्ये आणले. अनोळखी तरुणाने तरुणीची कोर्‍या कागदावर सही घेऊन लग्न करण्याचा गळ घातला. गायकवाड याने विनयभंग करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक निरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

पत्राशेडमधून 20 दुचाकी जप्त
कस्तुरबा मार्केटजवळील एका पत्राशेडमधील बंद खोलीत वीस दुचाकी सापडल्या आहेत. जोडभावीचे पोलिस निरीक्षक काळूराम धांडेकर, दुय्यम निरीक्षक ओमासे यांना चोरीच्या मोटारसायकलींची माहिती मिळाली होती. त्यानुसार रविवारी सकाळी पथकाने छापा मारून कारवाई केली. त्यात विविध कंपनीच्या वीस गाड्या सापडल्या आहेत. त्या कोणी आणून ठेवल्या आहेत. जागा कुणाची आहे, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुलेट, स्प्लेंडर, सीडी डिलक्स, स्कुटी, पल्सर, प्रो. शाइन आदी वीस दुचाकी आहेत. ज्यांच्या गाड्या चोरीला गेल्या आहेत त्यांनी कागदपत्रांसह जोडभावी पोलिसांत संपर्क साधावा.
जावयाकडून सासूला मारहाण
घरगुती कारणावरून सासू वजीराबाई कारमपुरी (वय 65, रा. घोंगडेवस्ती) यांना जावयाने बादलीने मारहाण केली. मार्कंडेय बसवराज यंगाडे (रा. घोंगडेवस्ती) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जोडभावी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. यंगाडे याची मुलगी सासू वजीराबाई यांच्याकडे झोपण्यास आली होती. त्यावेळी यंगाडे हा त्यांच्या घरी जाऊन माझी मुलगी कुठे आहे असा जाब विचारला. ती शेजारी लग्न असल्यामुळे मेहंदी लावण्यास गेल्याचे सांगताच मुलीला कुठेही पाठवतीस म्हणून बादलीने डोक्यात मारल्याची फिर्याद नोंद आहे.
आजारास कंटाळून एकाची आत्महत्या
पोटदुखीच्या आजाराला कंटाळून राजू राम इंगळे (वय 42, रा. न्यू बुधवारपेठ, सोलापूर) यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमाराला घडली. लुंगीने गळफास घेतल्याचे जोडभावी पोलिसांनी सांगितले.
दारू पिल्याने तरुणाचा मृत्यू
>नरसिंग सायबण्णा म्हेत्रे (वय 28, रा. जगजीवनराम झोपडपट्टी, सोलापूर) याचा रविवारी मृत्यू झाला. यशवंत मांडेकर, सुधाकर गुदमे या दोघांसोबत तो दारू पिण्यासाठी शनिवारी रात्री गेला होता. बेशुद्ध पडल्यामुळे दोघांनी त्याला घरी आणून सोडले. शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.