आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेश प्रक्रिया : पाच टक्क्यांनी उतरली यादी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अकरावी सायन्स शाखेतील प्रवेशासाठी दुसरी गुणवत्ता यादी विविध महाविद्यालयांत जाहीर झाली. मात्र, कला शाखेच्या अनेक जागा रिक्त असल्याने मागेल त्या विद्यार्थ्याला प्रवेश देणे सुरू आहे. शहरातील संगमेश्वर, वालचंद, दयानंद या महाविद्यालयांत अडीच ते चार हजार अर्ज दाखल झाले होते. या महाविद्यालयांच्या पहिल्या गुणवत्ता यादीत 90 टक्केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नावे झळकली. अर्ज करणारे विद्यार्थी सारखेच होते. त्यामुळे महाविद्यालयांतील केवळ 40 टक्के जागा भरल्या गेल्या. दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली. पाच टक्के यादी खाली उतरली. यातूनही 40 टक्के जागाच भरल्या जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे तिसरी गुणवत्ता यादी लावणे अपरिहार्य बनेल. पण या सर्वांमध्ये 60 ते 75 टक््के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची धावपळ होते आहे. नामांकित महाविद्यालयात प्रवेशाची दारे बंद आहेत. त्यामुळे सायन्स शाखेत प्रवेश घ्यायचा की, शाखा बदल करायचा. याचा निर्णय घेत येत नाही. त्यात तंत्रनिकेतनचे प्रवेश सुरू झाल्यानंतर आणखी काही जागा रिक्त होतील.