आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"उमंग'ने उलगडले विद्यार्थ्यांचे अंतरंग, स्नेहसंमेलन आणि ट्रॅडिशनल डेने आणली रंगत, तरुणाईचा जल्लोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सिंहगड कॉलेजमध्ये पाचव्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त उमंग-२०१५ ची संकल्पना साकारली. सांस्कृतिक कार्यक्रम ट्रॅडिशनल डे च्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात जान आणली. तरुणाईचा उत्साह पाहण्यासारखा होता. विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक पोषाखच परिधान केले असे नाही तर अभियांत्रिकीच्या प्रत्येक विभागाचे सामर्थ्य परंपरादेखील मांडली. यामुळे प्रत्येक जण या क्षणांचा आनंद घेत होता. कार्यक्रमाची सुरुवातच ढोलच्या दणदणाटाने झाली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी बहारदार लेझीम सादर केले. तसेच, स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले. स्वच्छ भारत या थिमवरून हे पथनाट्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
सांस्कृतिककार्यक्रमांनी रंगत
सांस्कृतिककार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलेचे दर्शन दिसून आले. लोककलेच्या सादरीकरणाला अक्षरश: डोक्यावर घेतले. मुजरा, कटपुतली, लावणी जय मल्हार एकाहून एक सरस असणाऱ्या या प्रकारांना तरुणाईची मोठी पसंती मिळाली. सिव्हिल विभागाच्या विद्यार्थ्यांनी परंपरा दाखविण्यासाठी कॉलेजच्या प्रांगणातच बुलडोझर, मिक्‍सर जेसीबी आणले होते. यावर स्वार होऊन त्यांनी प्रांगणाला चकरा मारल्या. त्यानंतर मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘हम भी किसी से कम नही’ असे दाखवत कार दुचाकीवरून मैदानात फेऱ्या मारल्या. कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थिनी अंगावर जीन्स, शर्ट चढवून डोक्यावर फेटा बांधून मैदानावर दाखल झाल्या. आमची काम करण्याची पद्धत जरी पाश्चात्य शैलीची असली तरीही आमच्या माथ्याशी आपली गौरवशाली भारतीय संस्कृती असल्याचे दाखवून दिले.

-यंदाच्या ट्रॅडिशनल डे मध्ये मुजरा हा प्रकार सादर केला. आपली कला सर्वांसमोर मांडण्याचा आनंदच वेगळा ठरतो.'' ज्योतीतिरपेकर, संगणक शास्त्र

-हा संस्कृतीचा उत्सव. आम्ही उत्सवाच्या रंगातून न्हाऊन निघालो. कलेतून दक्षिण भारताची संस्कृती मांडण्याचा प्रयत्न केला. माझे शेवटचे वर्ष असल्याने हा कार्यक्रमातून खूप आनंद लुटला.'' प्रणवबल्ला, बी. ई.सिव्हिल

- अभियांत्रिकीचे विद्यार्थी असलो तरी भारतीय संस्कृतीचा सार्थ अभिमान आहे. अशा कार्यक्रमातून आम्हाला ऊर्जा मिळते. आम्ही मनमुरादपणे याचा आनंद लुटला.'' ऐश्वर्या निंबाळकर, संगणक विभाग

-ट्रॅडिशनल डे दिवशी केवळ पारंपरिक पोषाख घालणे असे नाही तर आपल्या संस्कृतीचेही स्मरण करणे गरजेचे आहे. त्यानुसार कला सादर करण्याचा प्रयत्न केला.'' बरखादोशी, संगणक शास्त्र विभाग

-माझे या विद्यालयातील शेवटचे वर्ष असल्याने मी पारंपरिक दिनाचा मनसोक्त आनंद लुटला. हे दिवस माझ्या सदैव स्मरणात राहतील. पुढील आयुष्यात कॉलेजला खूप मिस करेन.'' ऋषिकेशश्रीमल, बी.ई. इलेक्ट्रिकल