आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९० व्यापारी गाळे बांधण्यास मंजुरी, बांधकाम समितीचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ग्रामीण भागात ठिकठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागांवर सेस फंडातून प्रायोगिक तत्त्वावर ९० व्यापारी गाळे बांधण्यास बांधकाम समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

वापरात नसणारी विश्रामगृहे ग्रामपंचायतींना कराराने देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती शहाजीराव देशमुख यांनी पत्रकारांना दिली.
समितीची बैठक गुरुवारी शिवरत्न सभागृहात झाली. श्री. देशमुख अध्यक्षस्थानी होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेची कागदपंत्र मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच, अतिक्रमण काढण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापारी गाळे बांधण्यासाठी यंदाच्यावर्षी प्रायोगिक तत्तावर सेस फंडातून एक कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

वैराग, माळशिरस, करमाळा आंधळगाव येथे एकूण ९० व्यापारी गाळे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी सर्वांधिक ५० व्यापारी गाळे माळशिरसमध्ये, तर करमाळ्यात २५ गाळे आहेत. वैरागमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी २५ आंधळगाव येथे पाच गाळे उभारण्यात येतील, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला सदस्य वामन बदे, महादेव पाटील, शिवाजी नागणे, उर्मिला पाटील ज्योती मार्तंडे उपस्थित होते.

विश्रामगृहांचा वापरच नाही
जिल्हापरिषदेच्या मालकीच्या अनेक विश्रामगृहांची पाहणी केली आहे. काही विश्रामगृह वापरात नाहीत. त्यामुळे नादुरुस्त होण्याची शक्यता असल्याने ती ग्रामपंचायतींबरोबर विशेष करार करून वापरासाठी देण्यात येतील. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. तसेच, संरक्षक भिंती नसलेल्या विश्रामगृहांसाठी त्या बांधण्यासाठी मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या, असेही देशमुख यांनी सांगितले.