आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commissioner Chandrakant Gudevar, Latest News In Divya Marathi

रस्ते खोदाई रोखल्याने ‘फोर जी’सेवेला विलंब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने महापालिकेकडून शहर हद्दीतील रस्ते खोदाईची परवानगी घेतली खरी, परंतु अटी व शर्थीचे उल्लंघन केले म्हणून मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी रस्ता खोदाईची परवानगी रोखली आहे. मनपा प्रशासन व रिलायन्स यांच्यातील तांत्रिक वाद विकोपाला गेला तर शहरवासीयांना ‘फोर जी’ सेवेसाठी तिष्ठत बसावे लागू शकते. विशेष म्हणजे खोदलेला रस्ता द्रुुस्तीचा खर्च मोठा असताना केवळ 6 कोटी रुपयांवर परवानगी दिल्याचा नवाच मुद्दा समोर आला आहे.
इंटरनेट यंत्रणा गतिमान करण्यासाठी ‘फोर जी’चे काम सोलापूर दूरसंचार कार्यालयाने हाती घेतले आहे. अंडरग्राउंड केबल टाकण्यासाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रॅक्चरला मक्ता दिला आहे. मार्च 2013 पासून शहरात खोदाई सुरू आहे. सुमारे 92 कि.मी. रस्ता खोदून अंडरग्राउंड केबल टाकले जात आहे. रस्ता खोदाई यांत्रिकीकरणाने न करता मनुष्यबळाचा वापर करण्याची अट घालण्यात आली होती. प्रत्यक्षात यंत्राचा वापर केल्याने अनेक ठिकाणी पिण्याची पाइपलाइन फुटणे, ड्रेनेजलाइन फुटण्याचे प्रकार घडल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे.