आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commissioner Gudewar Inspection Roads At Solapur

आयुक्त गुडेवार झाले दुचाकीस्वार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सिध्देश्वर यात्रेनिमित्त 68 लिंग प्रदक्षिणा मार्गावरील रस्ता दुरुस्ती, दिवाबत्ती आदी कामे 10 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. या रस्त्याची पाहणी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, मंदिर समिती सदस्यांनी मोटारसायकलवर फिरून सोमवारी केली.

होम मैदानावर आजोरा पडल्याने ते उचलण्याचे काम सुरू आहे. ते दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर मैदानावर रस्ता तयार करून पाणी मारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. जुनी मिल चाळ, मुरारजी पेठेतील बर्फ कारखाना, धरमसी लाइन येथील मार्गावर मुरूम टाकून पाणी मारून सपाटीकरण करण्यात येणार आहे.

आडवा नळ ते जय मल्हार चौक रस्त्याचे काम सुरू असल्याने 5 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. बाळीवेसेत खड्डे दुरुस्ती त्वरित करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला. खारीबावडी ते विजापूर वेसपर्यंतचा रस्त्यावर प्रामुख्याने खड्डे आहेत, ते दुरुस्त करण्यात येणार आहे. मार्कंडेय देवळाजवळ खड्डे असल्याने प्रिमिक्स टाकून बुजवण्यात येणार आहे, अशी माहिती नगर अभियंता गंगाधर दुलंगे यांनी दिली.