आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commissioner Of Police,Latest News In Divya Marathi

सोलापूरच्‍या सुरळीत वाहतुकीसाठी तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारावेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातून ये-जा करणार्‍या अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. शहराची लोकसंख्या व वाहनांची संख्या वाढली, पण त्या तुलनेत वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने उड्डाणपूल, भुयारी मार्ग, वाहतूक सिग्नल योजना अशा सक्षम पर्यायी योजना केलेल्या नाहीत. त्यामुळे अशोक चौक ते शांती चौक मार्गावर आणि सात रस्ता ते संभाजी तलाव तसेच शिवाजी चौक ते जुना पुणे नाका मार्गावर उड्डाणपूल बांधावा, असे पर्याय पोलिस आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत समोर आले.
सोलापूर चेंबर ऑफ कॉर्मस व यंत्रमागधारक संघ पदाधिकारी यांच्यासमवेत पोलिस आयुक्तालयात बुधवारी सायंकाळी बैठक झाली. या वेळी अशोक चौक ते शांती चौक, सात रस्ता, संभाजी तलाव तसेच शिवाजी चौक, जुना पुणे नाका या चौकांमध्ये वाहतुकीमुळे होणारे अडथळे याबाबत चर्चा झाली. या वेळी पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, उपायुक्त सुभाष बुरसे, पी. आर. पाटील, चेंबरचे मानद सचिव धवल शहा, खजिनदार नीलेश पटेल, संचालक विश्वनाथ करवा, मुरली अय्यंगार, यल्लप्पा येलदी, प्रकाश मलजी, संजय कंदले, अशोक मुळीक, बसवराज कुलकर्णी, सुभाष महाकांळे, प्रकाश जम्मा, राजगोपाळ सोमाणी, राजू राठी, सुभाष झंवर आदींनी सहभाग घेतला.
येथे असावा भुयारी मार्ग
शिवाजी चौकात रिक्षा, अँपेरिक्षा, बसची संख्या मोठी असल्यामुळे वाहतूक जॅम ही समस्या कायम आहे. पुणे रस्ता, सम्राट चौक आणि बाळीवेस या तीन मार्गांवर रिक्षा बेशिस्तीत थांबवलेले असतात. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडता येत नाही. या ठिकाणी अंतर्गत भुयारी मार्ग केल्यास नागरिकांना रस्ता पार करणे सहज सोपे होईल आणि शहरातील वाहतूकही सुरळीत राहण्यास मदत होईल.

महापालिका बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करू
व्यापारी व उद्योजकांची तिमाही बैठक असते. शहराच्या वाहतुकीसंदर्भातील भेडसावणारे प्रश्न अनेकांनी मांडले. अनेक सूचना व पर्याय समोर आले. महापालिका, बांधकाम विभागाकडे बैठकीचे इतिवृत्त प्रस्ताव रूपाने तयार करून पाठवले जाईल. त्यानंतर व्यापारी व पोलिस अधिकारी पाठपुरावा करतील. जबरदस्तीने कोणी वर्गणी मागणी करत असल्यास आम्हाला माहिती द्या, खंडणीची कारवाई होईल. प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त
आढावा घेऊन प्रस्ताव पाठवणार
आजच्या बैठकीत उड्डाणपूल, भुयारी पादचारी मार्ग, वाहतूक नियोजनासाठी सव्र्हे या बाबी चर्चेत आल्या. त्यानुसार सव्र्हे करून संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवला जाईल. वाहतूक नियोजनासाठी सुविधा गरजेची. मोरेश्वर आत्राम, सहाय्यक आयुक्त
बैठकीत चर्चेस आलेले महत्त्वाचे मुद्दे..!
पूर्व भागातील जोडबसवण्णा चौकात सिंगल डिव्हायडर बसवण्याची मागणी
चाटी गल्ली, फलटण गल्ली, मंगळवार पेठ परिसरातील पार्किंग समस्या सोडवा.
जुळे सोलापुरातील बसस्थानक सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत
मुख्य रस्त्यांचे सव्र्हे करून वाहतूक नियोजनाचा प्लॅन करावा
उत्सव मिरवणुकीत डॉल्बीचा नियमांची पायमल्ली करणार्‍यांवर कारवाई हवी
तीन ठिकाणी उड्डाणपूल
शिवाजी चौक, शांती चौक व सात रस्ता चौकात अशा तीन ठिकाणी उड्डाणपूल पाहिजेत. या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी याबाबींना प्राधान्य देण्याची मागणी बैठकीत राजू राठी, धवल शहा यांनी केली.