आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Commissioner Unplanned Visit In Setu Office In Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हाधिका-यांची सेतूला अचानक भेट, चालकासह 2 एजंटांवर गुन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी धाड टाकून सेतू कार्यालयाचा ताबा घेतला. दाखले, दाखले नोंद होणारे रजिस्टर व कार्यालयाची पाहणी केली असता वितरण खिडकीसमोर थांबलेल्या तरुणाकडे 17 पोच पावत्या आढळून आल्या. एक अपंग महिलाही सेतू कार्यालयात थांबल्याचे आढळल्याने या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देत या दोन एजंटासह पेस सिस्टिम कंपनी चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांना दिले.

डॉ. गेडाम कार्यालयाच्या जिन्यावरून धावतच सेतूत पोहचले. त्यांच्या मागोमाग इतर उपजिल्हाधिकारी, काही कर्मचारी पोहोचले. तत्काळ सेतूचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. काही कळायच्या आतच सेतूच्या प्रत्येक खिडकीजवळ उभे राहिलेल्या लोकांशी संवाद साधत कशासाठी आला आहे, याची चौकशी करत एक तरुणाच्या हातातील 17 पोच पावत्यांचा गठ्ठा ताब्यात घेतला.

जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी यांनी सेतू कार्यालयात आल्यानंतर तेथील दाखल्यांबरोबरच दाखल्याची नोंद होणा-या रजिस्टरचीही तपासणी केली. शिवाय सेतू कार्यालयात उपस्थित काही कर्मचा-यांशी संवाद साधत दाखल्यांची वितरण व्यवस्थेची माहितीही घेतली.

सेतू कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नाही. दाखले तयार झाल्यापासून ते वितरण होईपर्यंत माहिती देणारे सॉफ्टवेअर दिसले नाही. अनेक कर्मचारी ड्रेसकोडमध्ये दिसून आले नाहीत.

कर्मचा-यांवरही कारवाई
जिल्हाधिकारी गेडाम यांनी सेतू कार्यालयाच्या पाहणीनंतर एजंटासह सेतूचालकावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. याशिवाय यामध्ये महसूलमधील कर्मचा-यांचे संबंध आहेत का, याचीही तपासणी करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.