आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Common Man's Dream Seller Solapur Designer Sagar

सामान्यांची स्वप्ने विकणारा डिझायनर सोलापूरचा सागर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - डॉमिनोज पिझ्झा, मर्सिडीज बेंझ, व्होडाफोन अशा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या उत्पादनांची जाहिरात कोण करतो माहीत आहे? सोलापूरचा सागर शेट्टी. वय २६ वर्षे. विडी घरकुलसारख्या कामगार वसाहतीत शिकला. त्यानंतर ‘डेका अॅनिमेशन’मध्ये पदविका घेतली. पुण्यातल्या ‘अॅफिनिटी एक्सप्रेस’ या जगविख्यात जाहिरात कंपनीत सेवेला सुरुवात केली. आशयघन कल्पकता, अचूक वेध घेणारे व्हिज्युअल्स (चित्रे) चितारून त्याने भन्नाट जाहिराती केल्या. त्याच्या तल्लख बुद्धिमत्तेची दखल घेऊन कंपनीने ‘क्रिएटिव्ह हेड’ बनवले. हीच शिदोरी घेऊन आता सोलापुरात जाहिरात संस्था काढण्याचा त्याचा मानस आहे.

वृत्तपत्रांतल्या कॉर्पोरेट जाहिराती बनवण्यात ‘अॅफिनिटी एक्सप्रेस’ आघाडीवर आहे. भारताशिवाय अमेरिका, लंडन, फ्रान्स या देशातील बड्या कंपन्यांच्या जाहिराती या संस्थेमार्फत दिल्या जातात. त्यांची उत्पादने म्हणजे सामान्यांची स्वप्ने असतात. ती विकण्यासाठी कल्पक अशा जाहिराती बनवल्या जातात. कंपन्यांकडून फक्त उत्पादने आणि त्यांची वैशिष्ट्ये एवढीच माहिती पुरवली जाते. त्यातून ही उत्पादने ग्राहकांशी थेट भिडतील, अशा जाहिराती बनवण्याचे एक आव्हान असते. त्यासाठी नाना कल्पना लढवल्या जातात. डिझाइनरांच्या बैठकीत चर्चा केली जाते. अनेक प्रकारची प्राथमिक चित्रे काढली जातात. त्यातून सामान्यांना भुरळ पाडणा-या जाहिराती निवडल्या जातात. अर्थातच त्याचा मोबदलाही मोठा असते. पण तो कंपनीलाच मिळतो. डिझाइनरच्या हाती मात्र ठरलेलाच पगारच मिळतो.

सागरच्या शैक्षणिक वाटचालीत त्याचे मामा सराफ व्यापारी सुरेश बिटला यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सुवर्णपेढीत काम करत सागरने डेका अॅनिमेशनमधून पदविका घेतली. त्यानंतर बिटला यांनीच मदत केली. त्यांच्याशिवाय हे यश मिळाले नसते, अशी भावना सागर व्यक्त करतो.


पुढे वाचा... सकारात्मक सोलापूरसाठी...