आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

46 मुस्लिम जोडप्यांचा सामुदायिक विवाह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- व्हिक्टर यूथ फेडरेशन इज्तेमाई शादी कमिटीच्या वतीने पानगल हायस्कूलच्या प्रांगणात सामुदायिक विवाह सोहळा झाला. या विवाह सोहळयात एकूण 46 जोडपी विवाहाच्या रेशीम बंधनात बांधली गेली. शहर काझी अमजद काझी यांनी पारंपारिक मुस्लिम पद्धतीने विवाह विधी केले.
46 वधू-वरांची वर्‍हाडी मंडळी, भव्य मांडव आणि सगळीकडे लग्नाच्या गडबडीचेच वातावरण होते.
यावेळी कमिटीचे अध्यक्ष अब्दुल नदाफ, उपाध्यक्ष शकील बागवान, सचिव सय्यद बख्तायर, सहसचिव झाकीर शेख, खजिनदार इस्माईल शेख, हाजी सत्तार, मुख्तार बागवान, करीम कल्याणी, मोबीन कुरेशी, जुबेर कुरेशी आदींची उपस्थिती होती.
11 वर्षांची पंरपरा
व्हिक्टर यूथ फेडरेशन इज्तेमाई शादी कमिटीच्या वतीने गेली 11 वर्षे हे समाजकार्य चालते. आजवर अनेक गरीब जोडप्यांची लग्ने या सोहळ्यात झालेली आहेत. त्याने काहींना आर्थिक मदत तर काहींना मानसिक आधाराची मदत होते. या कामासाठी संस्थेव्यतिरिक्त अनेक हात मदतीला धावतात.

ही योग्य मदत
समाजाच्या विविध स्तरातून जेव्हा असे काम होते तेव्हा कौतुक वाटते. आज या ठिकाणी आमच्या नातेवाइकाच्याही मुलींचे लग्न झाले. ते कौतुकाने उत्साहाने झाले. त्यास मोठय़ा प्रमाणावर लोकही होते. त्याने आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया उपस्थित नातेवाइकांनी दिली.

संसारोपयोगी वस्तू

प्रत्येक जोडप्यांचे विधीवत निकाह झाल्या नंतर त्यांच्या संसारासाठी लागणा-या संसारोपयोगी वस्तूचे वितरण करण्यात आले. सर्वप्रकारची पाच भांडी यावेळी त्यांना देण्यात आली. वधूवरांना वस्त्र व दागिनेही प्रदान करण्यात आले.
समाजोपयोगी काम
मुस्लिम समाजातील वधूवरांचे एकत्रपणे विवाह करून देणे म्हणजे हे समाजोपयोगी काम आहे. सर्व स्तरातील लोकांच्या आनंदात आपला आनंद सामावला आहे. गोरगरीब, सामान्यस्तरातील लोकांना लग्नाची मोठी हौस असते मात्र ते करता येत नाही. त्यामुळे अशा लोकांना आनंद मिळवून देण्याचे काम आमच्या संस्थेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.’’ अब्दुल नदाफ, अध्यक्ष