आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Complaint Against Owner Of Pet Dog Who Bit People During Morning Walk

मॉर्निंग वॉक करताना कुत्र्यांनी घेतला चावा, मालकाविरुद्ध गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मॉर्निंग वॉक करण्यासाठी असताना पाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला चढवला आणि चावा घेऊन जखमी केल्याप्रकरणी कुत्र्यांच्या मालकाविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी, असिम इक्बाल बागवान (वय 49, रा. 923, बांधकाम वसाहत, ब्लॉक क्रमांक 5) हे 25 सप्टेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजता सिप्स अँड बाईटस् येथून फिरायला निघाले. तेथेच राहणार्‍या अतुल बच्चुवार यांच्या मोकळ्या सोडण्यात आलेल्या दोन काळ्या व आकाराने मोठय़ा कुत्र्यांनी बागवान यांच्यावर हल्ला चढवत त्यांचे चावे घेतले. त्यात ते खाली पडून जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बागवान यांनी बच्चुवार यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास साहाय्यक फौजदार माने करीत आहेत.