आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांना ढेकूण चावला अन् रेल्वेने डबाच बदलला, विभागातील पहिलीच घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे या तीन दिवसांपूर्वी सिद्धेेश्वर एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यातून मुंबईकडे चालल्या होत्या. प्रवासादरम्यान त्यांना ढेकूण चावला. याची तक्रार करताच रेल्वे प्रशासनाने धसका घेत चक्क डबाच बदलला. बुधवारी नवा डबा मुंबईहून सोलापूर विभागात दाखल झाला आहे. ढेकूण चावल्यानंतर रेल्वेचा पूर्ण डबाच बदलण्याची ही विभागातील पहिलीच घटना आहे. दरम्यान सर्वसामान्या प्रवाशांबाबत अशी घटना घडली असती तर रेल्वेने अशी तत्परता दाखवली असती का?, असा सवाल उपस्थित होतो.
याबाबत घटना अशी की तीन दिवसांपूर्वी आमदार प्रणिती शिंदे या कामानिमित्त मुंबईला चालल्या होत्या. िसद्धेेश्वर एक्स्प्रेसच्या प्रथम श्रेणी- सी या कुपीमध्ये त्यांचे आरक्षित तिकीट होते. सिध्देश्वर एक्स्प्रेस सोलापुरातून निघाली. गाडी कुर्डुवाडीजवळ आली असताना डब्यातील बेडरोलमधून ढेकूण चावल्याचे आमदार शिंदे यांच्या लक्षात आले. त्यानंतर आमदार िशंदे यांनी चैन ओढून गाडी रोखली. आमदारांनी गाडी रोखल्यानंतर रेल्वे कर्मचा ऱ्यांची पळापळ सुरू झाली. दरम्यान या प्रकाराने संतापलेल्या शिंदे यांनी कुर्डुवाडी येथून कारने जाणे पसंत केले.
व्यवस्थापकांकडे तक्रार
सिध्देश्वरएक्स्प्रेसमध्ये झालेल्या प्रकाराची तक्रार आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर विभागाचे व्यवस्थापक जॉन थॉमस यांच्याकडे केली. थाॅमस यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले. डबा तपासणीचे आदेश त्यांनी दिले. तपासणीच ढेकूण आढळले नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वे कडे पाठपुरावा करून कोच बदलून आणला. आमदाराच्या तक्रारीची दखल घेत चक्क डबा बदलण्याची तत्परता रेल्वेने दाखवली. उन्हाळा, दिवाळी सुटीत रेल्वेला भरपूर गर्दी असते. काही वेळेला आरक्षण मिळत नाही. जनरल डब्यातून सर्वसामान्य प्रवासी लटकत प्रवास करतात. अशा प्रसंगी मात्, एखादा डबा वाढविण्याची तत्परता रेल्वे दाखवत नाही.
खबरदारीसाठी डबा बदलला
आमदारप्रणिती शिंदे यांना ढेकूण चावल्यानंतर कोचची पूर्ण तपासणी करण्यात आली. डब्यात ढेकूण आढळले नाही . मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून डबाच बदलण्यात आला आहे. शिवाजीकदम, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता