आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Confederation Of Real Estate Developer Association Expo 2013 At Solapur

केड्राई प्रॉपर्टी एक्स्पो 2013 चे उद्यापासून आयोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कॉन्फिडेरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) सोलापूर शाखेच्या वतीने होम मैदान येथे 6 ते 8 डिसेंबर दरम्यान ‘केड्राई सोलापूर प्रॉपर्टी एक्स्पो 2013’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सुनील फुरडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
6 रोजी सकाळी 10 वाजता पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते व क्रेडाई इंडियाचे उपाध्यक्ष सतीश मगर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होईल. बांधकाम व बांधकाम साहित्याचे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात एकूण 38 विकसकांचे स्टॉल्स आहेत. तसेच यामध्ये 8 वित्तीय संस्था, तीन सिस्टीम्स, सोलर सिस्टमीस, स्टील, सिमेंट, इलेक्टिकल वायर्स आदी विविध स्टॉल्स असणार आहेत. राजेश गांधी, शशिकांत जिद्दीमनी, नंदकिशोर मुंदडा, समीर गांधी, प्रदीप पिंपरकर, किशोर चंडक, राजेंद्र शहा, प्रियदर्शन शहा, अभय सुराणा, मनीष मेहता आदी उपस्थित होते.