आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress And Nationalist Congress News In Marathi, Lok Sabha Election, Solapur

प्रचारात पडले काँग्रेस अन् राष्ट्रवादीचे स्वतंत्र गट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा - लोकसभा निवडणुकीचे मतदान आठवड्यावर येऊन ठेपले आहे. परंतु मंगळवेढा तालुक्यात अद्यापही प्रचाराला वेग आला नाही. नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे शेतकरीवर्ग त्रस्त आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक प्रचाराकडे कानाडोळा केला आहे. आमदार भारत भालके व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांचे दोन गट पडल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठीही दोन वेगवेगळ्या यंत्रणा कामास लागल्या आहेत. महायुतीचे उमेदवार अँड. शरद बनसोडे यांनी मतांचा जोगवा मागण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन पदयात्रा, कॉर्नर बैठका यावर भर दिला आहे.


पूर्वी तालुक्यात काँग्रेसचे प्राबल्य होते. (कै.) किसन र्मदा काँग्रेसचे नेतृत्व करीत होते. त्यांच्यानंतर तालुक्यात काँग्रेसची पडझड होऊन राष्ट्रवादीने आपले वर्चस्व वाढवले. सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीत दरी निर्माण झाल्याने येथे दोन वेगवेगळे मेळावे घ्यावे लागले. प्रचारातही दोन वेगवेगळे गट सक्रिय झाले आहेत. आमदार भालके यांनी यापूर्वीच गावभेटीच्या माध्यमातून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. मतदारांनी पाणी, रस्ते, विजेच्या प्रश्नांवरून प्रचारात नेत्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रशांत परिचारक यांनी ढवळस गावातून प्रचाराचा प्रारंभ केला.


तालुक्यात भाजपचे अस्तित्व फारसे नसताना अन्य पक्षांबरोबरील युतीमुळे मतांचा गठ्ठा तयार करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. उस्मानाबादमध्ये भाजपच्या रोहन देशमुखांच्या बंडखोरीमुळे शिवसेनाही प्रचारात सक्रिय नाही. आम आदमी पक्षाचे ललित बाबर यांनी सभेपेक्षा प्रा. दत्तात्रय खडतरे, प्रा. जगताप मधुकर भंडगे यांना घेऊन ‘होम टू होम’ प्रचार करीत आहेत. आपकडून तळागाळातील मतदारांना प्रत्यक्ष भेटण्यावरच भर दिला जात आहे. रहाटेवाडी येथे आमदार भालके यांच्या सभेत ग्रामस्थांनी रेंगाळत पडलेल्या विकासकामांच्या मुद्दय़ांवरून गोंधळ घातला. लोकप्रतिनिधींकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळत नसल्याचे पाहून ग्रामपंचायतीने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी ठराव केला आहे.


पाण्याचा प्रश्न निर्णायक ठरणार
प्रचारात दक्षिण भागातील पाणी प्रश्न चांगलाच गाजतो आहे. प्रत्येकजण ‘आम्ही पाणी देऊ, आम्हाला निवडून द्या’ अशी आश्वासने देत आहे. आतापर्यंत सत्ताधार्‍यांनी पाण्याच्या प्रo्नावरून निवडणुका लढवून आपली खुर्ची टिकवली. परंतु पाण्याचा प्रo्न कोणीच सोडवू शकलेला नाही. मतदारांनी हे ओळखल्यामुळे धाबे दणाणलेल्या नेते आता युवकांना हाताशी धरून निवडणुका जिंकण्याची व्यूहरचना आखत आहेत.