आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत जिल्ह्यात बिघाडीची लक्षणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीच्या स्पर्धेतून राजकारण तापत चालले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे आम्हालाच ती जागा सोडावी, अशी मागणी काँग्रेसकडून जोर धरत आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसच्या वाट्याचा मतदारसंघ पाहिजे, असा आग्रह धरल्याचे चित्र आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीत बिघाडी होण्याची स्थि निर्माण झाली आहे.
दोन्ही काँग्रेसने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले होते. जागा वाटपांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातूनही काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज मागवले होते. काँग्रेस राष्ट्रवादीची प्रदेश पातळीवर आघाडी झाली आणि मतदारसंघांचे वाटप झाले तर तेथील इच्छुकांनी पक्षाकडे जमा केलेला निधी परत देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. राष्ट्रवादीने मात्र सर्वच मतदारसंघातून उमेदवारी मागवली होती. दोघांच्या स्वबळाच्या चाचणीचा परिणाम इच्छुकांची संख्या वाढण्यापेक्षाही परस्परांमध्ये मतभेद वाढण्यात झाला. मतभेद असेच वाढत रािहल्यास त्याचा लाभ महायुतीला होण्याची शक्यता आहे.
करमाळा मतदारसंघ देण्याची काँग्रेसची मागणी
आघाडीच्या पूर्वीच्या जागा वाटपाप्रमाणे करमाळा व पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. पण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी दोन्ही मतदारसंघ काँग्रेसला मिळावेत, अशी जोरदार मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली. तसेच, करमाळ्यातील राष्ट्रावादीच्या उमेदवाराबाबत मतदारसंघात मोठी नाराजी असल्याने सक्षम उमदेवाराची गरज आहे. तो मतदारसंघ आघाडीच्या ताब्यात राहण्यासाठी काँग्रेसला मिळावा, अशी लेखी मागणी जिल्हाध्यक्ष पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे केलीय.
काँग्रेसची पडझड सुरूच
करमाळ्यात राष्ट्रवादीकडील जागेची मागणी करणाऱ्या काँग्रेसला माजी आमदार राजेंद्र राऊत व शहाजीबापू पाटील शिवसेनेत गेल्यामुळे बार्शीमध्ये व सांगोल्यात सक्षम उमेदवार मिळला नाही. तर, सोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसचे माजी महापौर महेश कोठे शविसेनेत गेल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे आहे. स्वत:च्या घरातील पडझड थांबवण्याऐवजी मित्रपक्षाच्या नाकदुऱ्या आेढण्यात दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते व्यस्त आहेत.

दोन्ही काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील अतंर्गत धुसफूस दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राष्ट्रवादीमध्ये मोिहते व माढ्याचे शिंदे बंधू यांच्यातील मतभेद तीव्र झालेत. जलि्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे यांनी करमाळ्यातून निवडणुकीला उभे राहण्याची चाचपणी सुरू केली आहे. विद्यमान आमदार श्यामल बागल राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या आहेत. संजय शिंदेंनी त्यांच्यापुढे मोठेच आव्हान निर्माण केले आहे.
भालके -परिचारक यांच्यातच सामना
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भारत भालके आणि प्रशांत परिचारक यांच्यातच खरा सामना रंगणार असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे सहयोगी आमदार म्हणून परिचित असणारे विद्यमान आमदार भारत भालके यांनीही काँग्रेसकडून इच्छुक म्हणून उमेदवारीची मागणी केली नाही. त्याचप्रमाणे परिचारक यांनीही उघडपणे राष्ट्रवादीकडे इच्छुक म्हणून अर्ज दाखल केला नाही. शिवसेनेकडून प्राचार्य रोंगे जोरादर तयारी करत आहेत.
बार्शी पॅर्टनची राष्ट्रवादीत चर्चा
आघाडीच्या जागा वाटपात बार्शी मतदारसंघ काँग्रेसकडे गेला. त्यामुळे बार्शीत गेल्या विधानसभा नविडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री दलिीप सोपल यांनी आघाडीचा धर्म सोडून थेट काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याबरोबर लढत दलिी. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्याऐवजी त्यांना मंत्रीपद दलिे. तोच पटर्न यावेळी राबवू, असे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत.
दक्षिणमध्ये दलिीप माने यांची डोकेदुखी वाढली
राष्ट्रवादीचे जलि्हा परिषद सदस्य सुरेश हसापुरे यांनी पक्षाकडे मागणी केली नाही. पण, निवडणूक लढविण्याची भूमिका घेऊन गावभेटी दौरा सुरू केलाय. आघाडी होणार असल्याने उमेदवारी मागून काय फायदा? त्यापेक्षा थेट मैदानातच उडी घ्यायची असे हसापुरे सांगत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे आमदार दलिीप माने यांच्या पुढील डोकेदुखी आणखीनच वाढली आहे.
माढ्यात राष्ट्रवादीविरोधात साठे, काळे यांची तयारी
माढ्यात काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे यांचा मुलगा दादासाहेब साठे यांनी विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केलीय. दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्यावर टीका केली. तसेच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कल्याणराव काळे यांनीही माढ्यातून लढण्याची तयारी सुरु केलीय. त्यामुळे आघाडीतील दुरावा अिधकच वाढत असल्याचे चित्र आहे.
काँग्रेसच्या तीन जागांवर राष्ट्रवादीचा दावा
राष्ट्रवादीच्या ताब्यातील मतदारसंघावर काँग्रेसने दावा केल्यामुळे राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेला शहर मध्य, शहर उत्तर व दक्षिण सोलापूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मािगतली आहे. उमेदवारी नाही मिळाली तरी आम्ही लढणारच अशी ठाम भूमिका शहर उत्तर मदारसंघातून माजी महापौर मनोहर सपाटे यांनी यापूवीच पक्षनिरीक्षकांसमोर बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर व माजी महापौर सपाटे हे शहर उत्तर व मध्य या दोन्ही मतदारसंघातून इच्छुक आहेत. दक्षिण सोलापूरचे तालुकाध्यक्ष बसवराज बगले, परविहन समितीचे माजी सभापती विजय हत्तुरे यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे.