आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीटंचाईच्या आडून रंगतोय काँग्रेस - भाजपात कलगीतुरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेत३० वर्षांपासून कॉंग्रेस सत्तेत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अॅड. यू. एन. बेरिया यांनी मनपाच्या आर्थिक परिस्थितीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर टीका केली. दुसऱ्या दिवशी पाण्यावरून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात आंदोलन केले. त्यानंतर पुन्हा बेरिया यांनी रस्त्यावर उतरून बघून घेऊ, म्हणत टीका केली. गुरुवारी आयुक्तांच्या दालनासमोर केलेल्या आंदोलनावेळी प्रा. अशोक निंबर्गी यांनी त्यांना प्रत्त्युत्तर दिले. निमित्त पाण्याचे असले तरी मनपा पोटनिवडणूक आगामी मनपा निवडणुकीची रंगीत तालिम आहे.

काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची चौकशी आमच्या सरकारमार्फत करू, असे प्रा. निंबर्गी यांनी म्हटले. बेरिया हे काँग्रेस तर निंबर्गी हे भाजपामधील महत्त्वाचे नेते आहेत. यापुढील काळात मनपा सभागृहातही अशाच प्रकारचे आरोप-प्रत्यारोप होतील.
प्रा. अशोक निंबर्गी


सत्ता गेल्याने कॉंग्रेस मवाळ
राज्यातकेंद्रात भाजपचे सरकार असल्याने मागील दहा महिन्यांपासून मनपा सभागृहात काँग्रेसची भूमिका मवाळ झाली आहे. जुळे सोलापूर विकास आराखडा, पदाधिकारी निधी यावर भाजप ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत आहे. झोन कमिटीत भाजपने मतदानातून एक झोन ताब्यात घेतले. त्यामुळे विषय समितीत शहर सुधारणा समिती देण्याची वेळ काँग्रेसवर आली.
बातम्या आणखी आहेत...