सोलापूर- देगावजोड कालवा, शिरापूर एकरुख सिंचन योजनेसाठी २४१.७० कोटींचा िनधी शासनाकडून खेचून आणला. राज्य सुवर्णजयंती नगरोत्थान अंतर्गत ड्रेनेज १४५ कोटींचा निधी, सुवर्ण जयंती शहर रस्ते विकास योजनेसाठी ४५.६० कोटींचा निधी अशा प्रकारे मतदारसंघातील विविध विकासकामे करून शेतकरी नागरीहित जोपासले. अशी माहिती, सोलापूर दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार, आमदार दिलीप माने यांनी माध्यमांना दिली.
वडील स्वातंत्र्यसेनानी ब्रह्मदेवदादा माने यांच्या श्रम, लोकहित संस्काराचा बालपणापासूनचा माझ्यावर प्रभाव होता. दादांनी त्यांच्या हयातीत माझ्यावर कोणत्याही संस्थेची जबाबदारी सोपवली नाही. ते वारशापेक्षा स्वकर्तृत्त्वावर सामजकार्यात मुलांनी मोठे व्हावे, अशा विचाराचे होते. त्यांच्या आशीर्वादाने मी जिद्दीने पेटून उठलो. विद्यार्थीदशेपासून मी विद्यार्थी चळवळ सामाजिक चळवळीत होतो.
२० वर्षापूर्वी पंचायत समितीचा सभापती झालो. त्यानंतर एकामागोमाग एक पदे िमळत गेली.िजल्हा मध्यवर्ती बँक असो की मार्केट कमिटी, तेथील कर्मचारी कार्यकर्त्यांशी सातत्याने माझा संवाद सुरू असतो. बेलाटीत ब्रह्मदेव दादा माने इन्स्टिट्यूट उभा केले. काँग्रेस पक्ष संघटन, मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचा अध्यक्ष अशा पदांवर कामाची संधी मिळाली. शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी स्वशासनाविरुद्ध आंदोलन करून न्याय मिळवून दिला. शेतकरी वर्गाच्या जगण्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी, यासाठी त्यांच्या हक्काचा साखर कारखाना उभारला. सेवा, संघर्ष आणि निर्मिती हा मंत्रच मी प्रामाणिकपणे जोपासला. बाजार समितीमध्ये द्राक्ष उत्पादकांसाठी बेदाणे विक्री केंद्र सुरू केले. माल विक्रीनंतर त्याच दिवशी शेतकऱ्यांना मालाची रक्कम अदा करणे. मार्केट कमिटीमध्ये अंतर्गत रस्ते उभारणे आदी विविध विकासकामे केली आहेत.