आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leader Santosh Patil Comment On Sshugar Cane Protest Issue

उसाचे आंदोलन केवळ स्टंटबाजी - संतोष पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेले आंदोलन हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षाही स्वत:चा दबदबा वाढवून मंत्रिमंडळात संधी मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. तसेच, धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसवर आरोप करणारे महादेव जानकर हेही मंत्रिपदासाठी धडपडपत आहेत, असे आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
श्री. पाटील म्हणाले, “काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी मोर्चा काढला होता. पण अद्यापही शेतकऱ्यांच्या उसाला दर मिळाला नाही. त्या संघटनेचे आंदोलन हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट आहे. राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. त्यामध्ये पक्षाला संधी मिळावी यासाठी राज्य शासनावर दबाव निर्माण करण्याचा खटाटोप शेतकरी संघटनेचा आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलने केली. काँग्रेस पक्षावर टीका केला. त्यांच्या पक्षाची सत्ता आली. पण अद्याही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. जानकरांनी त्याबाबत मौन बाळगले आहे. समाजाच्या हितापेक्षाही स्वत:ला मंत्रिपद मिळावे, यासाठी त्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, असेही पाटील म्हणाले.

उसाला विशेष अनुदान द्यावे
जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३१०० रुपये पहिली उचल मिळावी, जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर कमी असल्याने कारखानदारांना वाढीव दर देणे परवडत नाही. त्यासाठी शासनाने प्रत्येक टनामागे ४५० रुपये विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंबासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. उजनी धरणातील पाणीवाटपाचे नियोजन अद्याप पूर्ण झाले नाही. तसेच, शिरापूर एकरुख उपसा सिंचन योजना, माळढोक अभयारण्याचे क्षेत्र निश्चित करून जमिनीच्या व्यवहारांवरील निर्बंध उठविणे, दूध कांद्याचे दर निश्चित या स्थानिक प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली.

आताच का शेतकऱ्यांचा कळवळा
^गेली पंधरा वर्षे काँग्रेस सत्तेत होता. त्यावेळी शेतकरी संघटनेने आंदोलन केल्याशिवाय उसाला दर दिला नाही. कारखाने सुरू होऊन दोन महिने झाले. एकही काँग्रेस राष्ट्रवादीचा नेता उसाला दर देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर आलेला नाही. आम्ही सत्तेतील घटक पक्ष असून देखील सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहोत. काँग्रेस विरोधक असूनही ते मौन बाळगून गप्प आहेत. दीपक भोसले, जिल्हाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना