आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समन्वय बैठकीस सदस्य, अन् नगरसेवकांची दांडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या सत्काराच्या नियोजनासाठी काँग्रेस भवनात सोमवारी झालेल्या बैठकीला समन्वय समितीचे 14 पैकी दोन सदस्य तर 45 पैकी केवळ पाच नगरसेवकांनी हजेरी लावली. नगरसेवकांच्या काही सर्मथक व महिला काँग्रेस पदाधिकार्‍यांची मात्र उपस्थिती होती. या दांडीमुळे काँग्रेसमध्ये ‘समन्वय’ नसल्याचेच पुन्हा दिसून आले.

गेल्या काही दिवसांपासून शहर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळून येत असल्याचे चित्र आहे. परिवहन खात्याच्या बीओटी प्रकरणावरून सुरू झालेला वाद संपल्याचे सांगत सर्व काही अलबेल आहे, असे भासवण्याचा प्रयत्न काँग्रेसमध्ये दिसतो आहे. त्यातच कमिटीच्या कारभारावर नाराजी पसरली आहे. त्याचेच प्रत्यंतर बैठकीच्या निमित्ताने समोर आले. नियोजनासाठी काँग्रेस कमिटीने महापौर अलका राठोड, सभागृहनेते महेश कोठे व शहराध्यक्ष धर्मा भोसले यांच्या सहीने बैठकीचे पत्र काढले होते.

समन्वय समितीच्या माजी आमदार प्रकाश यलगुलवार, निर्मला ठोकळ, शहराध्यक्ष धर्मा भोसले व महापौर अलका राठोड हेच उपस्थित होते. अनेक ब्लॉक अध्यक्षांनीही दांडी मारली. विशेष म्हणजे शहराध्यक्षांविरुद्ध उठाव करणार्‍या पदाधिकार्‍यांना बैठकीचे पत्रच देण्यात आले नाही.

कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या सत्काराच्या निमित्ताने झालेल्या बैठकीनेही पक्षातील मरगळ दूर झालेली नाही, नाराजीच अधिक असल्याचे दिसते, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. महापालिकेतील बीओटी प्रo्नावर समन्वय समितीने लक्ष घालायला हवे होते, पण त्यांनी अनुपस्थित राहणेच पसंत केले.

बैठकीस अनुपस्थित नगरसेवक म्हणतात
संजय हेमगड्डी (माजी महापौर, नगरसेवक): माझ्या प्रभागात ड्रेनेजलाइन फुटल्याने मी बैठकीला जाऊ शकलो नाही.

फिरदोस पटेल (महिला व बालकल्याण सभापती)<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>: 15 मिनिटांतच बैठक झाली, मी पोहोचेपर्यंत बैठक संपलेली होती.

यू. एन. बेरिया (माजी महापौर, नगरसेवक): माजी तब्येत ठीक नसल्याने मी बैठकीला जाऊ शकलो नाही.

अनिल पल्ली (नगरसेवक): बैठक असल्याचा निरोप अन् पत्रही मिळाले नाही, त्यामुळे बैठकीला गेलो नाही.