आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Nationalist Not Approved 200 Buses To Municipal Corporation Department

महापालिका परिवहन खात्यासाठी 200 बस खरेदीला सत्ताधार्‍यांचा खो !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिका परिवहन खात्यासाठी 200 बस खरेदीच्या प्रस्तावाला सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारच्या सभेत ‘खो’ घातला. त्यामुळे हा प्रस्ताव अनिर्णीत ठेवण्यात आला. ‘हा प्रस्तावच आम्हाला कळलेला नाही, किमान 24 तासांचा तरी अवधी द्या,’ अशी आग्रही मागणी सदस्यांनी केली. त्यामुळे ही सभा मंगळवारी पुन्हा होईल.


केंद्र शासनाच्या योजनेतून 200 बस खरेदीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने परिवहन समितीकडे पाठवला. 12 फेब्रुवारीच्या आत त्यावर निर्णय घेण्याची मुदत दिली. त्यानुसार सोमवारी दुपारी सभापती सुभाष चव्हाण यांच्या
अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली.


आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचीही उपस्थिती होती. त्यांनी प्रस्तावाची सविस्तर माहिती दिली. परंतु सत्ताधारी सदस्यांनी हा प्रस्ताव कळलेला नाही. वेळ द्या. किमान 24 तासांचा अवधी द्या, अशी जोरदार मागणी केली. विरोधी सदस्यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळल्याने हा प्रस्ताव अनिर्णीत ठेवल्याचे सभापती चव्हाण यांनी जाहीर केले.


अशी आहे योजना
केंद्राच्या जवाहरलाल नेहरू शहर पुनर्विकास मिशनमधून 200 बस खरेदीसाठी 175 कोटी 90 लाखांचा हा प्रस्ताव आहे. त्यातून 20 वातानुकूलित बस, 35 मिनीबस आणि 145 साधारण बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी टाटा आणि अशोक लेलँडने निविदा भरल्या. सर्वात कमी दर देणार्‍या कंपनीला वर्क ऑर्डर देण्याचे आहे. तत्पूर्वी परिवहन समितीची मंजुरी आवश्यक आहे.

सदस्यांचे म्हणणे काय?
0बसच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी पाच वर्षांत 65 कोटींचा खर्च कसा?
0बस खरेदीवरील एलबीटी माफ करता येणार नाही का? त्याचा विचार का नाही?
0प्रस्तावात महापालिकेने 10 कोटी रुपये द्यायचे आहेत, हा पैसा कुठून आणणार?
सदस्यांच्या ज्या काही शंका-कुशंका आहेत, त्या दूर करण्याचे प्रयत्न केले. अजूनही त्यांचे समाधान होत नसल्यास मंगळवारच्या सभेत आणखी स्पष्टीकरण देऊ. मुदतीत प्रस्ताव मंजूर झाला तरच पुढच्या गोष्टी सुकर होतील.’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका