आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राष्ट्रवादी’ने दिली काँग्रेस नेत्यांना आमदारकीची हमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर - सोलापूर दक्षिण मतदारसंघातून आगामी विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोणालाही उमेदवारी द्यावी त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लावून निवडून आणू, असा शब्द देताना तालुक्याबाहेर आमदारकी जाऊ देऊ नका, असा सल्ला जिल्हा बँकेचे संचालक सुरेश हसापुरे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांना रविवारी दिला.

कुरघोट (ता. दक्षिण सोलापूर) गावात जिल्हा परिषदेच्या विविध योजनेतील 32 लाखांच्या विकासकामांचा प्रारंभ र्शी. शेळके, हसापुरे व इतर नेत्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. र्शी. हसापुरे म्हणाले, राजकारणात कोण कधी एकत्र येतील हे सांगता येत नाही. शेळके व मी बाजार समितीचे उपसभापती झालो. पण आम्हाला सभापती होता आले नाही. आता शेळकेंनी तालुक्याबाहेर आमदारकी जाऊ देऊ नये आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू, असेही त्यांनी सांगितले.

तर झेडपीचे अध्यक्ष करू : शेळके
बाळासाहेब शेळके म्हणाले, ‘देवकते व शिवदारेअण्णा यांच्यात मतभेद होते; पण ते विकासकामांमध्ये नव्हते. प्रत्येक गोष्टीत राजकारण कोणी करू नये. हसापुरेंनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून गरीब शेतकर्‍यांसाठी मोठा पैसा आणला. विकासकामांसाठी निधी खेचून आणण्याची धमक त्यांच्यात आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दक्षिण सोलापूरला आजपर्यंत मिळाले नाही. जर हसापुरेंना अध्यक्ष होण्याची संधी आली तर काँग्रेसच्या सर्व सदस्यांची ताकद लावू.