आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Rasta Roko Against BJP Government In Solapur

सरकारचे केवळ उद्योजकांसाठी अच्छे दिन, जनतेसाठी तर बुरेच!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भारतीय जनता पक्ष प्रणित केंद्र राज्य सरकारच्या चुकीच्या अन्यायकारक निर्णयांच्या विरोधात शहर काँग्रेसतर्फे विजापूर नाका येथे रास्ता रोको करण्यात आला. शहर अध्यक्ष प्रकाश यलगुलवार म्हणाले, “भाजप सरकार हे निव्वळ घोषणाबाज सरकार आहे. जनहितापेक्षा खुर्चीच अधिक प्रिय दिसत आहे. निवडणुकीत दिलेली आश्वासनांचे पालन टाळत आहे. जनतेच्या समस्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. गरीब, सर्वसामान्य माणूस शेतकरी, कामगार वर्गाला वाऱ्यावर सोडून अंबानी, अदानी मोठमोठ्या उद्योजकांचा फायदा करत आहे. जनतेसाठी बुरे तर उद्योजकांसाठी अच्छे दिन आये है.
आंदोलनावेळी प्रदेश निरीक्षक शिवाजीराव नीळकंठ, माजी आमदार निर्मला ठोकळ, महिलाध्यक्ष प्रा. ज्योती वाघमारे यांनीही केंद्र राज्य सरकार विरोधात भाषणे केली. आंदोलनात संजय हेमगड्डी, बाबा मिस्त्री, देवेंद्र भंडारे, अलका राठोड, मधुकर आठवले, पैगंबर शेख, आरिफ शेख, शिवा बाटलीवाला, अंबादास गुत्तीकोंडा, विश्वनाथ साबळे, केशव इंगळे, आझम सैफन, राजन कामत, प्रा. नरसिंह आसादे, माणिकसिंग मैनावाले, जाबीर अल्लोळी, सिद्धाराम चाकोते, सुमन जाधव, हेमा चिंचाेळकर, किसन मेकाले, चंद्रकांत काेंडुगळे, श्रीदेवी फुलारे, अनिल पल्ली, प्रा. अजय दासरी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते. शिवाजी जाधव यांनी आभार मानले.
रेल्वे मार्गावरच्या रहिवाशांचे पुनर्वसन करा-
विजापूरनाका, जुळे सोलापूर, टिकेकर वाडी, कल्याण नगर परिसरातील रेल्वे मार्गावरच्या झोपडपट्टी रहिवाशांच्या पुनर्वसनाची मागणी करण्यात आली. त्याशिवाय रेल्वे विभागाने कोणतीच कारवाई करू नये, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
घोषणांनी परिसर दणाणला
विजापूरनाक्यावर झालेल्या या अांदोलनावेळी ३०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. रेल्वे मार्गावरील झोपडपट्टी रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोदी, फडणवीस सरकारचा धिक्कार असो, भाजप सरकार हाय हाय, पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा, वीजदर कमी करा, एलबीटी रद्द करा, भूमी अधिग्रहण कायद्यातील तरतुदी रद्द करा, शेतकऱ्यांना मदत करावी, केशरी रेशन कार्डधारकांना पूर्वीप्रमाणे धान्य रॉकेल मिळावे, नथुराम गोडसेंचे उदात्तीकरण थांबवा, धर्मनिरपेक्ष समाजवाद शब्द वगळून घटनेची पायमल्ली करणाऱ्या सरकारचा धिक्कार, अशा विविध घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र राज्य सरकारच्या धोरणांविरोधात बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार.
20 मिनिटांचा रास्ता रोको, अटक सुटका
दुपारी १०.३० च्या सुमाराला रास्ता रोको आंदोलनाला प्रारंभ झाला. विजापूर नाका परिसरात आधी नेत्यांची भाषणे झाली. विविध घोषणा देत २० मिनिटे रास्ता रोको झाला. विजापूर नाका पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक नंतर सुटका केली.