आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस पक्षाचे तिकीट न मिळाल्यास शिंदेंना दाखवणार ‘हात’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मनपा सभागृहनेते महेश कोठे यांची बंडखोरीची भाषा गाजत असतानाच शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्यास इतर कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेऊन लढण्याची ठाम भूमिका माजी महापौर नलिनी चंदेले यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना मांडली. गेल्या काही दिवसांपासून चंदेले शिवसेनेत जाण्याची वावटळ होती, यासंदर्भात त्यांच्याची थेट संपर्क साधून त्यांचे मत जाणून घेतले.

सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवानंतर काँग्रेसचे स्थानिक नेते विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बंडखोरीची भाषा करू लागले आहेत. ‘अब नहीं तो कब नहीं’, हात मे तिरंगा नहीं तो सही और कोई,’ असे म्हणत काँग्रेस पक्षालाच आव्हान देणे सुरू झाले आहे. मागील आठवड्यात कोठे यांनी जाहीरपणे पक्षांतराचे संकेत दिले होते. शिंदे यांची मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाल्यानंतर पुन्हा थोडे सावध होऊन त्यांनी कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सूतोवाच केले. आता त्यांच्यानंतर जाहीरपणे पक्षाला आव्हान देणाºया चंदेले किती ठाम राहणार यावरून भविष्यातील राजकीय गणिते ठरणार आहेत.

पक्षांतर असेल, गांधीमार्ग कायम
शहर मध्यमधून आपण निवडणुकीची तयारी चालवली आहे. कॉँग्रेसने उमेदवारी दिली नाही, तर आपण कोणत्याही पक्षाकडून रिंगणात उतरू. हा देशच महात्मा गांधीजींच्या विचारांवर चालतो. समाजसेवेच्या संधीसाठी पक्षांतर करायची वेळ आली, याचा अर्थ गांधी विचार सोडला असे होत नाही. बचतगटाच्या माध्यमातून पक्षासाठी मोठे महिलांचे संघटन बांधले. राजकारणापेक्षा समाजसेवेवर भर दिला. मतदारांची नेहमीच आपणास साथ लाभली.

स्वकीयांचाही मला पाठिंबा
सोलापुरातील स्थानिक नेत्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य करण्याची हमी दिली आहे. माझ्या निर्णयाचे स्वकीयांनी स्वागत केले आहे. यापूर्वी प्रणिती शिंदे यांना निवडून आणा, तुम्हाला चांगले पद दिले जाईल, असे आश्वासन सुशीलकुमार शिंदे यांनी दिले होते. आजपर्यंत आपण पक्षीय राजकारणात कानोड्यात आहोत. आपण आजही कोणत्या एका पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. काँग्रेस पक्षाने माझा विचार न केल्यास आपण इतर पक्षाच्या उमेदवारीसाठी विचार करणार आहोत. शहर मध्यमधून विधानसभा निवडणूक हे एकमात्र लक्ष असेल असे चंदेले म्हणाल्या.
2009 मध्ये प्रणिती शिंदे यांच्यामुळे माघार
स्वातंत्र्यसेनानी छन्नुसिंग चंदेले यांच्यापासून चंंदेले कुटुंबाला राजकीय वारसा लाभलेला आहे. हेमू चंदेले आणि त्यांच्या वहिनी नलिनी चंदेले यांनी तो राजकीय वारसा पुढे जपला. नलिनी चंदेले यांना काँग्रेस पक्षातून महापौरपद आणि प्रदेश पातळीवर पक्षसंघटनेत स्थान मिळाले. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत शहर मध्यमधून त्या इच्छुक होत्या. सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना विधानसभेचे तिकीट मिळाल्याने त्यांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला होता.