आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Voice President Rahul Gandhi Tomorrow In Pune

पश्चिम महाराष्ट्राच्या आढाव्यासाठी युवा नेते राहुल गांधी उद्या पुण्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- येणार्‍या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पक्षाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी बुधवारी (दि. 25) पुण्यात बैठका घेणार असल्याची माहिती शहर काँग्रेसचे अध्यक्ष धर्मा भोसले यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्रातील दहा काँग्रेस कमिट्यांचा आढावाही ते घेणार आहेत. त्यात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूरमधील शहर व जिल्हा कमिट्यांचा समावेश आहे. राहुल गांधी स्वत: विद्यमान, माजी लोकप्रतिनिधी तसेच पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधून पक्षाची त्या-त्या लोकसभा मतदार संघातील स्थिती जाणून घेणार आहेत. पुण्यातील बालेवाडी क्रीडांगण येथे या बैठका दिवसभर चालणार आहेत. सकाळी नऊ वाजता सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी वेळ दिला आहे. तर दुपारी एक वाजता राज्यातील पक्ष प्रमुखांची बैठक होणार आहे. त्यात दोन हजार प्रतिनिधींना राहुल गांधी मार्गदर्शन करतील, असे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी सांगितले.