आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थिर सरकारसाठी काँग्रेसच्या बाजूने जनमताचा कौल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- काँग्रेसच स्थिर सरकार देऊ शकते, हे केंद्र सरकारने दाखवून दिले आहे. त्याउलट भाजपचे कर्नाटकातील सरकार अस्थिर झाले होते, तेथे भाजपने काहीच विकास केला नाही. त्यामुळेच जनतेने स्थिरतेच्या बाजूने कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया विजापूरच्या निरीक्षक व आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. सोलापूरला लागूनच कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा हे जिल्हे असल्याने या निवडणूक निकालाबाबत उत्सुकता होती. निवडणूक निकालात जिल्ह्यातील 8 पैकी 7 जागा काँग्रेसला मिळाल्या व इंडी या चर्चेत असलेल्या मतदार संघात काँग्रेसचे बसवनगौडा पाटील हे निवडून आले.

काँग्रेसतर्फे जल्लोष
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीने बुधवारी कर्नाटकातील विजयाचा जल्लोष साजरा केला. पेढे भरवून आनंद व्यक्त केला. या वेळी काँग्रेसचे पदाधिकारी माणिकसिंग मैनावाले, अंबादास गुत्तीकोंडा, हेमा चिंचोळकर, सूर्यकांत शेरखाने, विनोद भोसले, बसवराज म्हेत्रे, सोपान थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.

निकालाची पुनरावृत्ती होईल
काँग्रेस हा सर्व जाती, धर्मांना बरोबर घेऊन जाणारा असल्याने कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी यांना प्रोजेक्ट केल्यामुळेच भाजपची मोठी पिछेहाट झाली. राहुल गांधी उपाध्यक्ष झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती, त्यांना मोठा पाठिंबा मिळाल्याचे या निकालातून दिसते. या निकालाप्रमाणेच देशातील इतरही निकाल येत्या काळात दिसतील.’’
-प्रकाश यलगुलवार, निरीक्षक , बेळगाव, मेंगलोर